kolhapur Municipal election
kolhapur Municipal election sakal
कोल्हापूर

मनपा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर ; अरुण दुधवडकर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘शहर व जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेने आपली ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीने होत असून, शिवसेनेला याचा लाभच होणार आहे. शिवसेना आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असून, शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकवून शिवसेनेचा महापौर करून दाखवू,’ असा विश्वास शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केला. शिवसेना आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. दुधवडकर म्हणाले, ‘‘शहरासाठी काही महिन्यांत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला. शहराचा विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास शिवसैनिक तयार आहेत. ही निवडणूक स्वबळावर लढावी आणि जिंकून शिवसेनेचा महापौर करावा, यासाठी सर्वजण आग्रही आहेत. शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिकांचा २७ फेब्रुवारीच्या दरम्यान मेळावा आयोजित केला जाणार आहे.’’

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, पाचवेळा हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला आहे. या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी. याबाबत सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आग्रही असून, शिवसैनिकांच्याही याच भावना असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, शहरप्रमुख जयवंत हारुगले, शिवाजी जाधव, विनायक साळोखे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT