kolhapur sakal
कोल्हापूर

नगरपालिका कर्मचार्‍यांचे काम बंद

गडहिंग्लजला आंदोलन : सहायक आयुक्त पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ येथील नगरपालिका कामगार युनियनने काम बंद आंदोलन केले. यामुळे आज दिवसभर पालिकेचे कामकाज ठप्प झाले होते. याचा नागरिकांच्या कामावर परिणाम झाला.

आज काम बंद करुन पालिकेचे सर्व विभागातील कर्मचारी काळ्या फिती लावून कार्यालयाच्या आवारात ठिय्या मारला. या घटनेच्या निषेधार्थ विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस ठाण्याला निवेदन देवून अटक केलेल्या गुन्हेगारावर गतीने खटला चालवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सहायक आयुक्त श्रीमती पिंपळे या ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेवून अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करीत होत्या. त्यावेळी फेरीवाला अमरजित यादव याने त्यांच्यावर व अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे यांचे दोन बोटे पूर्ण तुटली आहेत. पालवे यांच्या हाताचे बोटही तुटले आहे.

हा प्रकार निंदनीय आहे. शासनाचे कनिष्ठ अधिकार्‍यांसाठी बदल्यांचे चक्राकार धोरण, पती-पतनी एकत्रिकरणाला नवीन धोरणात दिलेला फाटा व अशा जीवघेण्या हल्ल्यामुळे महिला अधिकार्‍यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. या हल्ल्याचे केवळ अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्चीकरण होते. यामुळे या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला.

नगराध्यक्ष स्वाती कोरी, कामगार युनियनचे सहसचिव सागर पाटील, ओंकार बजागे, निखिल पाटील, रविनंदन जाधव, धनंजय चव्हाण, अनिल चव्हाण, अवंती पाटील, प्रशांत शिवणे, रामा लाखे, काकासाहेब भुईंबर, बी. पी. आडावकर, डी. एम. पटेल, भैरु सलवादे, सुरेश माळगी, नरेंद्र कांबळे, सतीश मोरे, संदीप कुपटे, जयवंत वरपे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

- अजित माद्याळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT