कोल्हापूर
कोल्हापूर sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : आरक्षणाची लॉटरी फुटली

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, पन्हाळा, मलकापूर व वडगाव या नऊ नगरपालिकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. इचलकरंजी महापालिका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पुढील प्रक्रिया होईपर्यंत पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची कार्यवाही सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील सोडतीबाबत कमालीची उदासीनता दिसून आली. तर उर्वरित ठिकाणी ओबीसी आरक्षण नसल्याने सर्वत्र खुल्या वर्गातील महिलांमध्ये काटा लढत होण्याची शक्यता आहे.

इचलकरंजी येथे महापालिका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालिकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू राहणार आहे. त्यामुळे सोडतीवेळी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत राजकीय नेतेमंडळी व त्यांचे कार्यकर्ते उपस्‍थित होते. पालिकेच्या ६४ जागांपैकी ३२ महिलांना संधी मिळणार आहे. यामध्ये तीन जागा अनुसूचित जातीतील महिलांसाठी, तर उर्वरित २९ जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आहेत.

पेठवडगाव नगरपालिकेच्या निवडणुकासाठीचे प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. या ठिकाणी २० जागा असून प्रत्येक प्रभागात दोन उमेदवार निवडून येणार आहेत. आरक्षणामुळे प्रभाग २, ३ व १० मध्ये इच्छुकांत धाकधूक होती. प्रभाग तीनमध्ये अनुसूचित जाती व महिलाचे आरक्षण पडल्यामुळे एका इच्छुकाचा भ्रमनिरास झाला. प्रभाग १० मध्ये सर्वसाधारण पुरुष पडल्यामुळे एकाने फटाक्यांची आतषबाजी केली.

कुरुंदवाड नगरपरिषदेच्या ‘अ’ गटामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी ९ जागा, तर ‘ब’ गटात सर्वसाधारणसाठी ९ जागा निश्चित झाल्या. आरक्षणामुळे पालिकेवर महिलाराज येणार हे निश्चित झाले असून, अनेकांची बत्तीगुल होणार आहे. पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात एक महिला आणि तीन प्रभागांत अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडल्याने ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण राहिले. अनेक इच्छुकांची दांडी गुल झाली आहे.

कागल येथे ओबीसी आरक्षणशिवाय कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत काढली. २३ पैकी १२ जागा महिलांसाठी राखीव झाल्या. गडहिंग्लज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत २२ पैकी दहा जागा खुल्या, तर १२ जागा आरक्षित झाल्या आहेत. नव्या सभागृहात आता अकरा महिला प्रवेश करणार आहेत. मलकापुरात महिलांसाठी १० प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT