kolhapur new 81 covid 19 infection and one family 6 person infected health marathi news 
कोल्हापूर

कोल्हापुरात कोरोनाचे नवे 81 रुग्ण तर इचलकरंजीत एकाच कुटुंबात सहा जणांना बाधा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आज 81 ने भर पडली. त्यातील 40 जण कोल्हापूर शहरातील आहेत. दिवसभरात करवीर तालुक्‍यात 10, इचलकरंजीत 18, गगनबावडा 1, कागल 2, राधानगरी 2, हातकणंगले 2 तर परजिल्ह्यातील 6 व्यक्ती बाधित सापडल्या. 24 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. 

बाधितांची संख्या शहरातच वाढत असल्याची बाब गेल्या महिन्याभरात ठळकपणे दिसून आली आहे. आरोग्य संचालकांच्या सूचनेनुसार शहरात कॉंटॅक्‍ट ट्रेसिंग वाढविले आहे. परिणामी स्वॅब तपासणीसाठी आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये गर्दी आहे. दिवसाला 700 ते 850 स्वॅब एकट्या आयसोलेशनमध्येच संकलित होत आहे. सीपीआरमध्ये 70 ते 100 स्वॅब संकलित होतात. अन्य ठिकाणी 10 ते 50 अशी संख्या आहे. 

कर्नाटकात जाण्यासाठी स्वॅब तपासणी अत्यावश्‍यक असल्याने अनेकजण लक्षणे नसली तरी स्वॅब तपासणीसाठी येत आहेत. शहरात यापूर्वी बाधित आढळले आहेत, अशांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन स्वॅब घेण्यात येत आहेत. यातून शहरातील स्वॅब तपासणीची संख्या वाढली आणि शहरात जास्त संख्येने बाधित सापडत असल्याचे ठळक होत आहे. त्यामुळे शहरातच कोरोनाची भीती तूर्त वाढल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा- फिल्मी स्टाईलने सांगलीतील व्यापाऱ्याला गंडा घालणाऱ्या  चौघांच्या टोळीला अटक

एकूण बाधित ः 51 हजार 207 
कोरोनामुक्त ः 48 हजार 985 
कोरोनाने मृत्यू ः 1 हजार 756 
सक्रिय रुग्ण ः 466 

इचलकरंजीत एकाच कुटुंबात सहा जण 
 शहरात आज सलग दुसऱ्या दिवशी सात बाधित सापडले. यात नारायण मळा परिसरातील एकाच कुटुंबातील दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. आसरानगरमधील एक महिलाही बाधित आढळली. शहरात तब्बल 38 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या वस्त्रनगरीची चिंता पुन्हा वाढली आहे.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT