kolhapur new trend of cooking on bread with bread 
कोल्हापूर

राज्यात आला भाकरीसह चुलीवरच्या जेवणाचा ट्रेंड, आता पंजाबी किंवा पाश्‍चात्त्य पद्धतीचं जेवण विसरा

महादेव वाघमोडे

उजळाईवाडी (कोल्हापूर) : कोरोना संसर्गाच्या काळात अनेक जणांचे रोजगार बुडाले; परंतु तांबड्या-पांढऱ्या व पिवळ्या रस्यासह चुलीवरच्या भाकरीची चव ग्राहकांना भुरळ घालत आहे. हॉटेल व्यवसायात भाकरीसह चुलीवरच्या जेवणाची क्रेझ वाढली असून, यामुळे ग्रामीण व उपनगरातील महिलांना नवीन रोजगाराची संधी मिळाली आहे. 

काही दिवसांपूर्वी पंजाबी व पाश्‍चात्त्य पद्धतीच्या जेवणामध्ये पुरुषांचे वर्चस्व होते; परंतु सध्या चुलीवरच्या जेवणाचे महत्त्व वाढीस लागल्यामुळे येथे पुरुषांऐवजी महिलांच्या कौशल्याला विशेष वाव असतो. विशेषत: विविध प्रकारच्या भाकऱ्या बनवण्यासाठी महिलांना पर्याय नाही. यामुळेच हॉटेल व्यावसायिकांनी या कामांसाठी कौशल्यपूर्ण महिलांना रोजगार दिला असून त्यामुळे भाकरी बनवण्याची आवड आता रोजगाराची साधन बनली आहे.

कोल्हापूर शहराजवळील अनेक हॉटेल्समध्ये घरगुती पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळण्याची सुविधा ग्राहकांच्या पसंतीनुसार देण्यात येत आहे. या संकल्पनेला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे की सातबारा हॉटेलमध्ये आगाऊ नोंदणी करून ग्राहकांना जेवण देण्यात येते. येथे सोळापेक्षा अधिक महिला दहा वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी खवय्यांना बनवून देण्यात येतात. यासारखी अनेक हॉटेल्स ग्राहकांना घरगुती जेवण बनवून देत असून, यात महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.तसेच काही हॉटेल व्यावसायिक महिलांना घरच्या घरी भाकरी बनवण्याच्या ऑर्डर्स देत असून, त्या शेकड्यांमध्ये असतात. यामुळेही उपनगरांतील महिलांना काम मिळाले आहे.

दहा प्रकारच्या भाकऱ्या
ज्वारी, बाजरी, मका कळणा, शाळू, तांदूळ, नाचणी आणि कडधान्य अशा दहा प्रकारच्या भाकरी सातबारा हॉटेलमध्ये मिळतात. या भाकरी करण्याचे विशेष कौशल्य ग्रामीण महिलांमध्ये आढळते. हे पीठ विशिष्ट प्रकारे लहान-मोठे दळावे लागते, तसेच काही पीठ गरम पाण्यामध्ये तर काही पीठ सामान्य तापमानाच्या पाण्यामध्ये मळावे लागते.

ग्रामीण महिलांकडे स्वादिष्ट भाकरी बनवण्याची कला उपजत असते. आमच्या हॉटेलमध्ये १६ हून अधिक महिला भाकरी बनवण्यासाठी कार्यरत आहेत. विविध दहा प्रकारच्या भाकरी मिळण्याचे एकमेव ठिकाण अशी आमची खासियत आहे.
- राहुल सावंत, मालक, सातबारा हॉटेल

भाकरी करण्याची कला आईपासून शिकून यात पारंगत झाले. भाकरी करण्याचा छंद जडला असून, यातून रोजगार मिळाला आहे. मोठे लोक भाकरीचे जेवण खाऊन तृप्त होतात व कौतुक करतात.
- इंदुबाई बागडी

चुलीवरच्या भाकरीचे जेवण खाल्ल्यानंतर इतर ठिकाणच्या हॉटेलमधील जेवणानंतर सुस्ती न येता उत्साह जाणवतो. कोल्हापूरव्यतिरिक्त अशीच चव कोठेही अनुभवायला मिळत नाही.
- अमित वेंगुर्लेकर, सावंतवाडी

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT