kolhapur pachgaon old woman murder case 
कोल्हापूर

अंगावर शहारे आणणारी घटना; भरदिवसा अवघ्या अडीच तासांत वृद्धेचा केला गेम 

राजेश मोरे

कोल्हापूर - भरदिवसा अवघ्या अडीच ते तीन तासात वृद्धेचा गेम करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. गुन्ह्यात मोपेडचा वापर केल्याची धक्कादायक माहिती संशयित संतोष परीटच्या चौकशीतून पुढे येत आहे. त्याच्या घराची झडती घेऊन पुरावे शोधण्याचे काम सुरू केले. मृतदेहाचे इतर अवयवांच्या शोधाबरोबर यात त्याचा कोणी साथीदार आहेत का? याचाही तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सांगितले. 

राजाराम तलाव परिसरात बुधवारी सकाळी महिलेचा अर्धवट मृतदेह सापडला. पोलिसांनी हा मृतदेह पाचगाव येथील शांताबाई आगळे यांचा असल्याची ओळख पटवली. त्याचबरोबर तातडीने संशयित मारेकरी संतोष परीटला अटक केली. त्याने हा खून सोन्याच्या दागिन्यातून कर्ज फेडण्यासाठी केला असल्याची कबुली दिली होती. त्याला आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 18  फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत शुक्रवारी (ता.5) त्याची मुले सकाळी शाळेला गेली. त्यानंतर त्याने पत्नीला नातेवाईकांच्या उत्तरकार्यासाठी सोडले. तेथून तो पाचगावला आगळे यांच्या घरी गेला. त्यांना देवाचे कार्य सांगून बाहेर बोलवून घेतले. त्यांना रिक्षाने टाकाळा माळी कॉलनी येथील घरात आणले. येथे त्याने आगळे यांचा खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर अवेशष राजाराम तलाव परिसरात टाकण्यासाठी मोपेडचा वापर केला. त्यानंतर दुपारी त्याची मुले शाळेतून घरी आली. त्यावेळी तो घरीच होता. सायंकाळी पत्नी घरी आली त्यावेळीही तो घरीच होता अशी माहिती पुढे आली आहे. संशयित परीट हा चौकशीला प्रतिसाद देत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

घराची झडती... 
संशयित परीट माळी कॉलनी टाकाळा येथील अपार्टमेंटच्या बेसमेंटमधील खोलीत राहतो. त्याठिकाणी त्याला आज नेण्यात आले. घटनास्थळाची पहाणी करून झडती घेतली. अपार्टमेंटमधील सीसी टीव्हीही पोलिसांकडून तपासण्यात आले. 

घटनास्थळाची सफाई कशी ः 
खूनाचे कृत्य करून मृतदेहाची विल्हेवाट अवघ्या अडीच ते तीन तासात लावली अशी माहिती चौकशीत पुढे आल्याने घटनास्थळाची सफाई इतक्‍या लवकर कशी झाली याबाबतची माहितीही पोलिसांकडून घेतली जात आहे. 

पत्नीचे जबाब नोंदवला ः 
संशयित परीटच्या पत्नीचा आज जबाब नोंदविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. त्यात हा प्रकार मला माहीत नाही. मी त्यावेळी नातेवाईकांकडे गेल्याचे सांगितले. घरी आलो त्यावेळी सगळ काही ठिक होते अशी माहिती पुढे आली आहे. त्याची खातरजमा पोलिस करीत आहेत. 

फायनान्स कंपनीकडून मागवली माहिती... 
खूनानंतर सोने फायनान्स कंपनीत ठेऊन त्यावर कर्ज काढले असल्याचे संशयिताने पोलिसांना सांगितले. आगळे यांच्या अंगावर किती तोळे दागिने होते. त्यापैकी संशयिताने किती दागिने तारण ठेवले. इतर सोने अन्य कोणाच्या नावावर ठेवले आहे का? याबाबतची माहिती फायनान्स कंपनीकडून मागविण्यात आली आहे. 

पाचगाव ते टाकाळा रिक्षा प्रवास 
संशयित शुक्रवारी (ता.5) पाचगावातील आगळे यांच्या घरात गेला. देवकार्याचे कारण सांगून त्यांना बाहेर बोलवून घेतले. पण त्यांना मोपेडवर बसता येत नसल्याने त्यांना रिक्षात बसवले. रिक्षात आगळे तर त्यांच्यापुढे संशयित मोपेडवरून संशयित असा त्यांचा पाचगाव ते माळी कॉलनी असा प्रवास झाल्याचे तपासात पुढे येत आहे. 


तुकडे केले कसे ? 
खूनानंतर संशयिताने मृतदेहाचे तुकडे केले का? तसे कृत्य त्याने केले असेल तर ते कोठे केले? त्यासाठी कोणते हत्यार वापरले? यात त्याचा आणखी कोणी साथिदार आहे का? या प्रश्‍नाची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पण संशयित चौकशीला योग्य तो प्रतिसाद देत नसल्याने अद्याप याची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT