kolhapur pachgaon old women murder case
kolhapur pachgaon old women murder case 
कोल्हापूर

माणुसकीला काळीमा; मृतदेह फेकल्यानंतर दोनदा केली खात्री

राजेश मोरे

कोल्हापूर - दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा भिंतीवर डोके अपटून खून केला. अंगावरील दागिने काढून घेऊन मृतदेह पोत्यात बांधला. त्यानंतर तो मोपेडवरून राजाराम तलाव परिसरात फेकून दिला. काही वेळानंतर पुन्हा तेथे जावून मृतदेहाची खात्री संशयित संतोष परीटने केल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. फायनान्स कंपनीत ठेवलेले सोने जप्त करण्याची प्रक्रियाही पोलिसांनी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सांगितले. 

राजाराम तलाव परिसरात 10 फेब्रुवारीला सकाळी महिलेचा अर्धवट मृतदेह सापडला. पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह पाचगावातील शांताबाई आगळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या खून केल्याप्रकरणी संशयित संतोष परीटला अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. त्याने आगळे यांना देवकार्याचे कारण सांगून 5 फेब्रुवारीला घरी घेऊन आला. त्यानंतर त्याने त्यांना आपल्या खोलीत नेले. तेथे भिंतीवर त्यांचे डोके आपटले त्यानंतर त्या डोक्‍यावर पाठीमागे पडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्याने काढून घेतले. मृतदेह वाकवून पोत्यात भरला. ते पोते मोपेडवरून राजाराम तलाव परिसरात फेकून दिले. त्यानंतर त्याने काहीवेळाने पुन्हा तेथे जावून मृतदेहाची खात्री केली. भरदिवसा सुमारे अवघ्या अर्धा पाऊण तासात हे कृत्य केल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. 

सोने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू... 
संशयिताने आगळे यांचे दागिने दोन फायनान्स कंपनीत तारण ठेऊन तेथून सुमारे दोन लाखांचे कर्ज घेतले असल्याची माहिती पुढे आली आहे. हे सोने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ते सोने जप्त करण्यात येणार असल्याचे डुबल यांनी सांगितले. 

सीसी टीव्ही फुटेज ताब्यात घेणार... 
संशयित परीटच्या माळी कॉलनीतील घरात आगळे त्या दिवशी गेल्या. त्यानंतर काही वेळाने फक्त परीट तेथून मोपेडवरून निघून गेला हा प्रकार परिसरातील सीसी टीव्हीत कैद झाला आहे का? त्याची माहिती घेऊन ते ताब्यात घेण्याचे काम पोलिस करीत आहेत. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT