police sakal
कोल्हापूर

ड्यूटी सांभाळत मुलांचे संगोपन;महिला पोलिस गावडे

मातृत्व आणि कर्तव्याची सांगड...

नंदिनी नरेवाडी-पाटोळे

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराचा घाटी दरवाजा, शुक्रवारी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी गर्दी, या दरवाजातून आत जाणाऱ्या प्रत्येक भाविकाकडे तिचे लक्ष, कोण बॅग आत नेतंय का?, काही संशयास्पद वस्तू आहे का?, कोणाचा मोबाईल हरवला तर कोण चोरटा टेहाळणी करतो का?, यावर तिची करडी नजर,त्याचवेळी कडेवर वर्षाची मुलगी आणि बाजूला तीन वर्षांचा मुलगा. या दोघांचीही काळजी तिच्या चेहऱ्यावर होती. मातृत्व आणि कर्तव्याची सांगड घालत ‘ती’ मात्र तन्मयतेने सेवा देत होती. अश्विनी गावडे असे या महिला पोलिसाचे नाव.अश्विनी या पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत.

त्यांचे पती युवराज हे आर्मीत असतात. सासर घुणकी तर माहेर कुरुंदवाड. यामुळे तीन वर्षांचा आयुष आणि एका वर्षाची कादंबरी या दोघांनाही सांभाळायची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. त्यामुळे कोठेही ड्यूटी असली की त्या या दोन्ही मुलांना घेऊन कर्तव्य पार पाडतात. दिवस असो वा रात्र. कोणत्याही वेळेत ड्यूटी करण्यास त्या तयार असतात. आरोपींना कोर्टात नेणे असो किंवा जोतिबा यात्रेचा बंदोबस्त. तसेच अंबाबाई मंदिर परिसरातील ड्यूटी असो. सर्वच ठिकाणी त्या मुलांना सोबत नेतात. ड्यूटीवर असताना मुले झोपली तर त्यांना तेथील उपलब्ध बाकड्यावर झोपवायचे.

तेथेच त्यांना दूध पाजायचे, खाऊ घालायचे. त्यांना शांत करून पुन्हा कामाला लागायचे. अशी कसरत करताना त्यांचे सहकारीही त्यांच्या मदतीला धावतात. वरिष्ठांचेही मार्गदर्शन असते. याच जोरावर त्यांनी गेले चार महिने ड्यूटी, घर आणि मुलांचा सांभाळ ही तिहेरी आव्हाने लिलया पेलली आहेत. नोकरी कोणतीही असो, खासगी, शासकीय किंवा निमशासकीय घर, मुले आणि ड्यूटी सांभाळत स्त्री तिचे कर्तृत्व सिद्ध करू शकते, याचा वस्तुपाठच अश्विनी यांनी घालून दिला आहे.

सातव्या महिन्यांतच प्रसूती

अश्विनी गावडे या २०१० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पोलिस भरती झाल्या. तिथे कंट्रोल रूमला काम पाहू लागल्या. याच वेळी विवाह झाला. तरीही धावपळ आणि दगदगीमुळे सातव्या महिन्यांतच कळा सुरू झाल्या आणि प्रसूती करावी लागली. बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवावे लागले.

घर, मुले आणि कर्तव्य सांभाळताना कसरत होते. मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांची मदत यामुळे मी कर्तव्याची जबाबदारी पार पाडू शकते. मुलेही समजूतदार आहेत. त्यांचीही मला साथ आहे.

- अश्विनी गावडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: फेरारीतून एन्ट्री, हाफ चड्डी अन्... ; Mumbai Indians च्या सराव सत्राला 'अतरंगी' स्टाईलमध्ये पोहोचला हार्दिक पांड्या...

Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल

Pali News : पालीत पोलिसांचा आदर्श उपक्रम; ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, सामाजिक ऐक्य दृढ

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

SCROLL FOR NEXT