Kolhapur Politics Sanjay Ghatge Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

Hasan Mushrif : 'मी आणि संजय घाटगेंनी सर्व निवडणुकांत एकत्र काम करण्याची शपथ घेतलीये, आमच्या मैत्रीला दृष्ट लागू नये'

‘संजय व मी कॉलेज जीवनात जीवलग मित्र होतो. मात्र, राजकीय परिस्थितीमुळे तीस वर्षे एकमेकांच्या विरोधात लढलो.

सकाळ डिजिटल टीम

'विरोधक असूनही त्यांनी अन्नपूर्णा साखर कारखान्याला मदत केली. कारखान्यासाठी घेतलेल्या कर्जाची नक्कीच आम्ही परतफेड करू.'

सिद्धनेर्ली : ‘येणाऱ्या सर्व निवडणुकांत एकत्र राहून काम करणार आहोत, अशी शपथ मी व संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांनी घेतली आहे. आमच्या मैत्रीला कोणाची दृष्ट लागू नये,’ असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. वंदूर (ता. कागल) येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यानिमित्ताने मुश्रीफ व घाटगे यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली.

मुश्रीफ म्हणाले, ‘संजय व मी कॉलेज जीवनात जीवलग मित्र होतो. मात्र, राजकीय परिस्थितीमुळे तीस वर्षे एकमेकांच्या विरोधात लढलो. त्यानंतर एका विशिष्ट वळणावर एकत्र आलो. सर्वसामान्य जनता, शेतकरी, तरुण यांच्या आयुष्यात समृद्धी आणणे, हेच आमचे ध्येय आहे. यासाठी दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून काम करणार आहोत.’

संजय घाटगे म्हणाले, ‘मंत्री मुश्रीफ सकाळी साडेपाचपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची कामे करत असतात. गेली पंचवीस वर्षे त्यांचे या कामात सातत्य आहे. माझ्यासारखा माणूस थकला असता. मात्र, ते उत्साहाने हे सर्व करत आहेत. त्यांच्यासारखा नेता राज्यात नाही. विरोधक असूनही त्यांनी अन्नपूर्णा साखर कारखान्याला मदत केली. कारखान्यासाठी घेतलेल्या कर्जाची नक्कीच आम्ही परतफेड करू. त्यांना चांगले आयुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’

यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, पुंडलिक खोडवे, विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रताप माने, बिद्रीचे संचालक रणजित मुडुकशिवाले, ए. वाय. पाटील-म्हाकवेकर, सरपंच दीपाली कांबळे, बबन खोडवे, पारिसा जंगटे ,धनाजीराव घाटगे, आदी उपस्थित होते उत्तम कांबळे यांनी स्वागत केले. नामदेव चौगुले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT