कोल्हापूर

कोल्हापूर रेल्वेला लॉकडाउनमध्ये  उत्पनाला 10 कोटींचा फटका 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : लॉकडाउनमुळे कोल्हापूर रेल्वेस्थानकाला तब्बल 10 कोटींचा फटका बसला आहे. रोज सुमारे आठ-साडेआठ हजार प्रवाशांची गैरसोय झाली आहे. अद्यापही केंव्हापासून नियमित रेल्वे सेवा सुरू होईल, याची माहिती स्थानिक प्रशासनाला नाही. स्पेशल रेल्वे व्यतिरिक्त रिझर्व्हेशनही बंद आहे. अनेक प्रवाशांकडून रिझर्व्हेशन आणि रेल्वे केंव्हा सुरू होणार? याची विचारणा स्थानकावर होत आहे. 

कोल्हापूर रेल्वेस्थानकावरून नियमित सुटणाऱ्या आठ रेल्वेगाड्या आहेत. मुंबईसाठी तीन तर इतर गाड्या विशेष करून परप्रांतात जातात. तसेच आठवड्यातून असलेल्या गाड्यांची संख्या वेगळी आहे. एका रेल्वेगाडीत साधारण दीड हजार प्रवासी ग्रहित धरले जातात. कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज टर्मिनल्स अर्थात रेल्वेस्थानकातील रिझर्व्हेशन खिडकीवर महिन्याला सुमारे दीड कोटीं रुपये तिकिटाद्वारे महसूल मिळतो. तोही बुकिंगचा आहे. या व्यतिरिक्त पॅसेंजर गाड्या आणि रिझर्व्हेशन नसलेल्या प्रवाशांची संख्या वेगळी आहे. 

25 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले आहे. तेंव्हापासून केवळ स्पेशल गाड्या व्यतिरिक्त एकही रेल्वेगाडी धावली नाही. त्यामुळे रिझर्व्हेशनसाठी असलेली धावपळ बंद आहे. केवळ स्पेशल गाड्यांसाठी एक खिडकी उघडी ठेवली जाते. राज्यातील इतर स्पेशल गाड्यांसाठी कोल्हापुरातूनही रिझर्व्हेशन होत आहे. मात्र कोल्हापुरातून एकही गाडी नसल्याची माहिती स्थानिक रिझर्व्हेशन कक्षातून दिली आहे. 

कोल्हापुरातून रोज केवळ मुंबईसाठी तीन रेल्वेगाड्या धावतात. प्रत्येक गाड्यांत सुमारे दीडहजार प्रवासी असतात. बेंगळूर, गोंदिया, सोलापूर या ठिकाणीही प्रवासी संख्या अधिक आहे. सोलापूरसह इतर ठिकाणच्या रेल्वे गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात रिझर्व्हेशन होते. मात्र आता रेल्वे सुरू केव्हा होणार? याची माहिती प्रशासनाकडून दिलेली नसल्यामुळे पुढील रिझर्व्हेशन लॉकडाउनमध्ये अडकले असल्याचे रिझर्व्हेशन कक्षातून सांगण्यात येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT