Kolhapur Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur News: रेल्‍वे तिकिटाचा काळाबाजार; एकाला अटक

पोलिसांचा स्‍थानकात छापा; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल

सकाळ वृत्तसेवा

Kolhapur Crime News : येथील रेल्वेस्थानकावर ‘तत्काळ’च्या तिकिटाची काळ्याबाजाराने विक्री केल्‍याप्रकरणी आज रेल्वे पोलिसांनी छापा टाकून अटक केली.

सचिन जगदाळे (वय ३७) असे संशयिताचे नाव आहे. ‘सकाळ’मधून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘रेल्वेची कंजुषी एक्स्प्रेस’ या वृत्ताची दखल घेऊन ही कारवाई झाली.

येथील रेल्वेस्थानकावर दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांना जादा पैसे घेऊन तिकीट विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून लक्ष ठेवले होते.

सकाळी दहाच्या सुमारास एक व्यक्ती एका प्रवाशाला जादा पैसे घेऊन तिकीट देताना पोलिसांनी त्याला जागेवर ताब्यात घेतले. त्याची दिवसभर चौकशी केली. यात तो तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची खात्री झाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला पुणे येथील

रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या कारवाईत रेल्वे पोलिस निरीक्षक विजय मानझी, कर्मचारी विजय पार्टे व संजय कांबळे यांनी सहभाग घेतला.

वरिष्ठांनी घेतली होती दखल

दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी निघालेल्या अनेक प्रवाशांना ‘तत्काळ’ तिकीट सहजपणे मिळत नाही, असा अनुभव आहे. यातील काही प्रवाशांना हेरून त्यांना जादा पैसे घेऊन तिकीट देण्याचे प्रकार घडत होते. यावर ‘सकाळ’ने प्रकाशझोत टाकला होता. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील रेल्वेस्थानकाला नुकतीच भेट देत पाहणी केली होती,

तेव्हा याची माहिती सांगितली होती. काही प्रवाशांनी याच आशयाच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘तत्काळ’ किंवा आरक्षणाचे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रांग सीसीटीव्हीसमोर लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वारंवार तिकीट घेण्यासाठी येणाऱ्या त्याच त्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना होत्या. त्याची रेल्वेस्थानकावर अंमलबजावणी सुरू झाली.

तिकीट कक्षात पोलिस बंदोबस्त

‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर रेल्वे पोलिसांनी ‘तत्काळ’ तिकीट कक्षात पोलिस कर्मचारी नियुक्त केले होते. तिकीट कक्षात किंवा परिसरात तिकिटांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी लक्षही ठेवले होते.

तरीही ‘तत्काळ’ तिकिटासाठी रात्री साडेअकरापासून रांगेत काही संशयित लोक दिसत होते. त्यांना हटकले होते. आज अचानकपणे रेल्वे पोलिसांनी छापा टाकला. यात एकाला तिकिटाचा काळा बाजार करताना पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate case: माणिकराव कोकाटेंना अद्याप अटक नाही, मध्यरात्री काय घडलं? डॉक्टरांनी काय सांगितलं?

Pune News : पेशवे सृष्टीचे काम रखडले; पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

CM Devendra Fadnavis: फलटणला सर्वात आधुनिक शहर बनवू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टीकाटिप्पणीपेक्षा विकास हा माझा अजेंडा!

Prakash Shinde: ड्रग्ज प्रकरणातून शिंदे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न: प्रकाश शिंदे; अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार!

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

SCROLL FOR NEXT