Balinga Bridge on Kolhapur-Gaganbawda Road esakal
कोल्हापूर

Balinga Bridge : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर कोल्हापुरातील 'हा' मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला; अवजड वाहनांना बंदी!

बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने पाच तालुक्यातील जनतेची झाली गैरसोय

सकाळ डिजिटल टीम

पालकमंत्री केसरकर काल जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते.

बालिंगा : जिल्हा प्रशासनाने बालिंगा पूल (Balinga Bridge) वाहतुकीसाठी बंद केल्याने पाच तालुक्यातील जनतेची गैरसोय झाली. याबाबत राजेंद्र सूर्यवंशी यांनी आंदोलन केले, तसेच करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुंबईत मंत्रालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक सुरू करावी, अशी मागणी केली.

याबाबत पालकमंत्र्यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत निर्णय घेत दुपारी तीनच्या सुमारास रस्ता वाहतुकीस सुरू केला. दरम्यान, पादचारी, दुचाकी व चारचाकी गाड्यांना सोडण्यात आले. मात्र अवजड वाहनांना बंदी असल्याचे सांगितले.

पालकमंत्री केसरकर काल जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोल्हापूर- गगनबावडा मार्ग सुरू करण्यासाठी पाण्याची पातळी किती आहे आणि बालिंगे पुलाची परिस्थिती पाहून जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन माजी आमदार नरके यांना दिले. यातून दुपारी तीनच्या सुमारास रस्ता वाहतुकीस खुला केला. यामुळे नागरिक, प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT