Shiv jayanti esakal
कोल्हापूर

कोल्हापूर : शहरात शिवजयंतीचा माहोल

विविध तालीम संस्थांसह मंडळांकडून अनेक उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील विविध तालीम संस्थांसह मंडळांनी शिवजयंती दिमाखात साजरी करण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे.शिवरायांच्या पुतळ्याचे मिरवणुकीने स्वागत संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे देवल क्लब इथून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. ढोल-ताशाच्या ठेक्याने मिरवणुकीची रंगत वाढवली. बिंदू चौक, आझाद चौक, उमा टॉकीज, लक्ष्मीपुरीमार्गे पुन्हा बिंदू चौक येथे मिरवणूक आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा जयघोष येथे करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी महापौर रामभाऊ फाळके, माजी नगरसेवक हरिदास सोनवणे, सत्यजित कदम, जयेश कदम यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी अध्यक्ष सुमीत पवार, उपाध्यक्ष संदीप पाटील, खजिनदार सोनल घोटणे, सचिव कपील यादव, ओंकार खराडे, संजय तोरस्कर, रतन हुलस्वार, प्रवीण सोनवणे, रवी पाटील, अप्पा लाड, बाळासाहेब मुधोळकर, विनायक चंदुगडे, महेश ढवळे उपस्थित होते.

शंभूराजे पोवाडा नाट्याने शिवप्रेमी स्तब्ध

संयुक्त जुना बुधवार पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे तोरस्कर चौकात शिवजयंती सोहळ्यासाठी स्टेज उभारले आहे. संभाजी महाराज यांची बुद्धिमत्ता, शत्रूशी लढण्याचे धैर्य, उत्तम राज्य कारभाराची सूत्रबद्ध मांडणी करत शिवप्रेमींना शंभूराजे पोवाडा नाट्याने खिळवून ठेवले. शाहीर रंगराव पाटील यांच्या भेदक शाहिरीला टाळ्यांची दाद मिळाली. त्याचे लेखन युवराज पाटील, तर युवराज ओतारी यांनी दिग्दर्शन केले. सागर माने, प्रथमेश लोहार, पराग निट्टूरकर, सखाराम चौगले, दीपक खटावकर, प्रणोती कुमठेकर, दिव्या टोणपे, ऋग्वेद निकम, प्रतीक साठे या कलाकारांनी उत्तम अभिनय केला. बाळासाहेब खांडेकर हार्मोनियम, दयानंद कांबळे ढोलकी, लक्ष्मण पाटील, ईश्वरा बोराटे, कृष्णात जाधव, रणजित सुतार, गणेश वाईंगडे यांनी संगीत साथ दिली.

शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके

संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे मिरजकर तिकटी येथे शिवजयंती सोहळ्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, यशराजे छत्रपती, ऋतुराज क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‍घाटन झाले. त्यानंतर शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर झाली. प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. खंडोबा-वेताळ, शिवबाचा मावळा, हिंद प्रतिष्ठान, ताराराणीसह अन्य संघांचा यात सहभाग होता. या वेळी गोपी पोवार, ऋत्विक गवळी, प्रसाद खोराटे, आर्यनिल जाधव, स्वरूप निंबाळकर, अनिकेत घोटणे, सौरभ गवळी, प्रथमश भोसले, अजिंक्य साळोखे, प्रथमेश मोहिते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit: रोहित शर्मा मॅच खेळत होता अन् 'तो' अचानक कोसळला; तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पळापळ झाली अन् सर्वच घाबरले

Railway Ticket Upgrade : स्लीपरच्या पैशात AC चा प्रवास! तेही एकही रुपया जास्त न देता? जाणून घ्या काय आहे रेल्वेचा ऑटो अपग्रेड नियम

New Year Trip Places : कमी खर्चात नव्या वर्षाची ट्रीप प्लॅन करताय? 'ही' आहेत 5 बेस्ट ठिकाणे..कमी पैशात डबल मजा

Pune: परवानगी नसेल तर सभा महागात पडणार अन्...; पुणे महापालिकेचे रॅली-सभांसाठी कडक नियम लागू

Capricorn Yearly Horoscope 2026: राहु, शनि आणि गुरु कसा बदलणार तुमचं आयुष्य; वाचा संपूर्ण वार्षिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT