Teacher bank sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : शिक्षक बँकेसाठी तिरंगी लढत

गुरुजींचे राजकारण रंगणार; मोर्चेबांधणीस वेग, तिन्ही पॅनेलचा दावा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेसाठी सत्तारूढ शिक्षक संघाच्या वरुटे पॅनेलविरुद्ध शिक्षक समिती व थोरात गट संघ यांचे राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक पॅनेल व पुरोगामी संघटनेचे आपलं पुरोगामी समविचारी परिवर्तन पॅनेलमध्ये सामना रंगणार आहे.

संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांची १३ वर्षांपासून बँकेत सत्ता आहे. त्यांनी बहुतांश नवीन कार्यकर्त्यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांनी आजी-माजी संचालकांना बरोबर ठेवण्यात यश मिळविले. वरुटे गटात कोणीही बंडखोरी केली नाही. सत्तारूढ गटाने आपले उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर केल्याने त्यांनी प्रचार सुरू केला आहे.

शिक्षक समिती व थोरात गट शिक्षक संघाने युती करून राजर्षी श्री शाहू स्वाभिमानी शिक्षक पॅनेल जाहीर केले. पॅनेलमध्ये कास्ट्राईब संघटना, डीसीपीएस संघटना व शिक्षक भारती यांनाही प्रत्येकी एक जागा दिली आहे. समिती व थोरात गटाने प्रत्येकी सात जागांवर उमेदवार उभे केले आहेत. इतर संघटनांसह पॅनेल केले आहे.

पुरोगामी संघटनेचे प्रसाद पाटील यांनी विरोधी गटांशी जागा वाटपात समझोता न झाल्याने आपलं पुरोगामी समविचारी परिवर्तन पॅनेल जाहीर केले. त्यांना थोरात गटाचे माजी संचालक सुरेश कांबळे यांची साथ लाभली. गडहिंग्लज, भुदरगड व गगनबावडा तालुक्यातील इच्छुक उमेदवार मिळाले. शिक्षक सेना, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ यांनाही उमेदवारी दिली. त्यामुळे हे तिसरे पॅनेलही भक्कम झाले आहे.

सत्तारूढ गटाने सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवार ठरविले. तालुका कार्यकारिणीने निवडलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. सत्तारूढ गटात एकानेही बंडखोरी केलेली नाही. आजी-माजी संचालक प्रचारात आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.

- राजाराम वरुटे, सत्तारूढ शिक्षक संघ पॅनेलप्रमुख

डीसीपीएस, कास्ट्राईब व शिक्षक भारती या संघटनांना उमेदवारी दिल्याने पॅनेल मजबूत झाले आहे. जुन्या व नव्याचा मेळ घालून पॅनेल परिपूर्ण केल्याने आमचा विजय

निश्चित आहे.

- जोतिराम पाटील, समन्वयक, राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक पॅनेल

पुरोगामीवर विश्वास ठेवून शिक्षक समिती, थोरात गट, प्रहार व शिक्षक सेना यांच्यातील प्रमुख शिलेदारांनी पॅनेलची उमेदवारी स्वीकारली आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेल भक्कम झाले. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.

- प्रसाद पाटील, पॅनेलप्रमुख, आपलं पुरोगामी समविचारी परिवर्तन पॅनेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT