kolhapur vitthal Devotees leave for Pandharpur Yatra 
कोल्हापूर

गावागावांत लागली विठ्ठल भेटीची ओढ 

सुरेश साबळे

कसबा तारळे : माघी वारीसाठी जिल्ह्यातून, राधानगरी तालुक्‍यासह विशेषत: पश्‍चिम भागातून गावोगावच्या वारकरी दिंड्यां पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले अन्‌ आता त्यांच्या पाठोपाठ गावांगावांतून अन्य भाविकही मिळेल, त्या वाहनांतून मोठ्या संख्येने पंढरीच्या दिशेने रवाना होवू लागले आहेत. विशेष म्हणजे विठ्ठल भक्तांमध्ये गळ्यात तुळशीमाळा असलेल्या वारकऱ्यांबरोबरच माळकरी नसलेल्यांची संख्याही नेहमीप्रमाणेच यंदाही मोठी आहे. 

पंढरीचा विठूराया हा महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्याच्या दर्शनासाठी वर्षातून किमान एकदा ठरलेल्या वारीला वारकरी हमखास पंढरीत दाखल होतातच. महिन्यातून एक अशा पंढरीच्या किमान 12 वाऱ्या करणारेही अनेक वारकरी आहेत. या वाऱ्यांपैकी आषाढी व कार्तिकी या दोन मोठ्या वाऱ्यांसह चैत्री व माघी वारीलाही वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात. 

कोल्हापूर जिल्ह्यातील पीक परिस्थिती व शेतीकामाच्या सवडीनुसार वारकऱ्यांबरोबरच ज्यांच्या गळ्यात पंढरीची तुळशीची माळ नाही, असे अनेक भाविकही माघी वारीला पंढरपूरला हमखास हजेरी लावतात. वर्षभराच्या कामातून विसावा या अर्थाने पाच-सहा दिवसांसाठी पंढरीत वास्तव्य करण्याच्या हेतूने जाणाऱ्या भाविकांची संख्याही कोल्हापूर जिल्ह्यात लक्षणीय आहे. दरवर्षी या माघी वारीसाठी घरांघरांतून अनेकजण एस.टी. बस, प्रासंगिक कराराच्या गाड्या,दुचाकी,चारचाकी,भाडोत्रीसह खासगी वाहने अशा मिळेल त्या वाहनाने पंढरपूरची वाट धरतात. प्रामुख्याने वारकरी पायी चालत जाण्याच्या प्रथेनुसार दिंड्यांमधून पाच-सहा दिवसांपूर्वीच पंढरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. आता उरलेसुरले वारकरी आणि अन्य भाविकही विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने रवाना होत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत ही संख्या वाढतच राहील. 

"यंदाची माघीवारी येत्या बुधवारी (जया एकादशी) असून मोठ्या गर्दीमुळे दर्शन वेळेत व व्यवस्थित व्हावे आणि रोजच्या कामातून थोडा विसावाही मिळावा या हेतूने अनेक भाविक पाच-सहा दिवस पंढरीला मुक्कामाच्या जोडणीने रवाना झाले आहेत. म्हणूनच आम्ही दरवर्षी न चुकता पंढरीला माघी वारीसाठी मोठ्या मुक्कामाच्या तयारीनेच जातो.' 
- दत्तात्रय धोंडी पाटील, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, कसबा तारळे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT