कोल्हापूर : देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज वेबसाईट उघडून हा ऑनलाईन विक्री प्रारंभ झाला.
हेही वाचा - इंग्रजीने दिले जगण्याचे बळ अन् ध्येयही!
जिल्ह्यामधील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट उत्पादनांना कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी ऑनलाईन प्रॉडक्ट विक्री या मोहिमेचा प्रारंभही मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरात झाला. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे जीवनमान उंचावणे, हा या अभियानाचा मुख्य उददेश आहे.
कोल्हापूर जिल्हयामध्ये १२ हजार १०० इतक्या स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करणेत आलेली आहे. तसेच २६० ग्रामसंघ व दोन प्रभाग संघाची स्थापना करणेत आलेली आहे. जिल्हयातील प्रसिद्ध असलेले कोल्हापूरी चप्पल ऑनलाईन लिंकवरून उत्पादन विक्रीसाठी खुले केले. कोल्हापूरी गुळ, काकवी, व्हाईट मेटल ज्वलरी, कोल्हापूरी दागिने, मध, विविध प्रकारचे मसाले, कोल्हापूरी कांदा व लसुन चटणी, मिरची पावडर, गारमेंट प्रोडक्ट,मास्क, इत्यादी अनेक वस्तू अमेझॉन या संकेतस्थळावर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन पानारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा - सोयाबीनच्या दरात 700 रुपयांनी घसरण
जगात भारी.. कोल्हापुरी...
मुश्रीफ म्हणाले,‘जगात भारी... कोल्हापुरी ...’ असा कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक सर्वदूर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या शेतीमालासह औद्योगिक व महिला बचत गटांच्या उत्पादनांनाही दर्जा व गुणवत्तेमुळे बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अमेझॉनसारख्या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळून त्यांचे सक्षमीकरण होईल.’
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.