कोल्हापूर ः तब्बल पंचवीस वर्षे विद्यार्थी वाहतूक केल्यामुळे शिवाजी पंदारे नव्हे तर "रिक्षा मामा' म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली. कोरोनाकाळात चार महिने शाळा बंद राहिल्या पर्यायाने रिक्षा बंद राहिल्या. आज-उद्या शाळा सुरू होतील म्हणून आशेवर राहिले. अखेर त्यांनी गाडीवर "चिकन 65'ची विक्री सुरू केली. रिक्षा चालवितानाचा त्यांचा जो उत्साह होता. तोच आताही "चिकन 65' च्या गाडीवर दिसून येतो. "काय करायचे किती दिवस वाट पहायची, आता रिक्षा मामा नव्हे चिकनवाले मामा झालोय' अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रीया दिली. वयाच्या 53व्या वर्षी त्यांचा स्टार्टअप अनेकांना ऊर्जा देवून जात आहे.
नवीन रंगविलेली हातगाडी चार दिवसांपासून सुभाषनगर चौकात दिसू लागली. "शिवाजी मामा चिकन 65' असा बोर्ड गाडीवर झळकला होता. सायंकाळी सुरू झालेली गाडी रात्री सुरू होती. पांढऱ्या ट्युबच्या प्रकाशात रिक्षा मामा अर्थात शिवाजी पंदारे दिसत होते. अनेकांना हा आर्श्चयाचा धक्का होता. अनेकांच्या घरोघरी रोज जावून त्यांचा संपर्क वाढला आहे. त्यांच्या व्हॉटस् ऍपवरील स्टेटसवर त्यांची गाडी (रिक्षानव्हे चिकनची) दिसली आणि अनेकांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या रिक्षातून पहिली दुसरीला जाणारे आता इंजिनिअर झाले, अनेक क्षेत्रात मोठे झाले. पण रिक्षा मामाचा जिव्हाळा कमी झाला नाही.
कोरोना महामारीचा फटका जगभरात सर्वांना बसला त्यापैकी एक म्हणजे शिवाजी पंदारे होय. पंचवीस वर्षात वर्दी करून (विद्यार्थी वाहतूक) दोन मुलींची लग्ने आणि मुलाचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. मात्र कोरोनात आर्थिकस्थीतीने घाईला आणले. पण आत्मविश्वास असला तर अशक्य काहीच नाही, याप्रमाणे त्यांनी चिकन 65 विक्रीची गाडी सुरू केली आहे. नगरसेवक भूपाल शेटे यांचे ते कट्टर समर्थक आहेत. शिवाजीमामाची चिकन 65 विक्रीची गाडीची कल्पना त्यांनाही आवडली. त्यांनी ही थोडा आर्थिक हातभार लावला.
सकारात्मक राहण्याचा सल्ला
शिवाजी पंदारे यांनी मेहुणा अमोल चव्हाण याच्याकडून त्यांनी चिकन 65 तयार करण्याची कसब शिकून घेतली. आणि मामांच्या सोबत मेहुणा सुद्धा सहकार्य करू लागला. थोडा जम बसत आहे. आता ग्राहकांची आणखी मागणी वाढत आहे.
नऊपर्यंत चिकन संपते. मामानी व्यवसाय बदलला आहे, पण ते खुश आहेत. बी पॉझिटीव्ह राहण्याची त्यांचा पद्धत आणि हसतमुख चेहरा त्यांना पुन्हा यशाकडे घेवून जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.