Let any calamity come, we are strong ...! 
कोल्हापूर

कोणतीही आपत्ती येऊ दे, आम्ही खंबीर...! 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन महापुराच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार झाले आहे. ग्रामीण भागातील आपत्तीकाळात केवळ अर्ध्या तासात तर शहरात पंधरा मिनिटांत मदत पोहचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात महापुराच्या काळात कोणत्याही तालुक्‍यात आपत्ती निर्माण झाल्यास केवळ अर्ध्यातासांत तर शहरातील आपत्तीवेळी पंधरा मिनिटांत मदत देण्याचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी अधिक प्रमाणात बोटी आणि लाईफ जॅकेटची व्यवस्था केली आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांची फौजही तयार आहे. त्यामुळे संकट किती ही मोठे असले तरीही आम्ही खंबीर असल्याची भूमिका आता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतली जात आहे. 

शहरारातील आपत्ती व्यवस्थापनाचे काम अग्नीशमन दलाकडून होणार आहे. तर प्रत्येक तालुक्‍यातील आपत्ती व्यवस्थापन त्या त्या तालुक्‍यातून नियंत्रीत होणार आहे. त्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात असणार आहे.

जिल्ह्यात कोणतीही घटना घडल्यास त्याची नोंद तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षात होणार आहे. तेथून पुढील नियोजन केले जाणार आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा सर्व डाटा तयार करण्यात आला आहे. कोठे कोणते साहित्य आहे. कोणत्या ठिकाणी कोण स्वयंसेवक आहे. याचीही अपडेट माहिती कक्षात उपलब्ध आहे. सध्या 24 तास हा कक्ष सुरू आहे. एसएमएस सुविधेसह आरोग्य, वीज, पाटबंधारे, बांधकाम, महसूल अशा सर्वच पातळीवर येथे नियोजन झाले आहे. 

आकडे बोलतात... 
गतवर्षी बोटींची संख्या 17 यावर्षी 55 
गतवर्षी लाईफ जॅकेट 200 यावर्षी 550 
गतवर्षी सेफ्टी रिंग 110 यावर्षी 310 
गतवर्षी स्वयंसेवक 600 यावर्षी 800 

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापना मध्ये यंत्रसामुग्रीसह स्वयंसेवकांची फौज तयार केली आहे. तातडीने काय उपाय योजना करण्यात येतील याचे नियोजन केले आहे. ग्रामीण भागातील आपत्ती मध्ये अर्ध्यातासांत तर शहरीभागात पंधरा मिनिटांत मदत देण्याची आमची तयारी आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी साधनसामुग्री अधिक असल्यामुळे त्याचाही फायदा होईल. 
- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : ज्योतिबाचे दर्शन ठरले अखेरचे; पंचगंगा नदीपात्रात पोहताना दुर्गमानवाडचा तरुण बुडाला

SCROLL FOR NEXT