Lifeguard given to dogs trapped in the chamber kolhapur marathi news 
कोल्हापूर

...म्हणून चेंबरमध्ये अडकेलेल्या त्या दोघांना मिळाले जीवनदान......

सुयोग घाटगे

कोल्हापुर  : देव तरी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती नानाविविध प्रकाराने अनेकांनी अनुभवली असेल. याच पद्धतीने लॉकडाऊन मुळे निर्मनुष्य असणाऱ्या रस्त्यावरील चेंबर मध्ये दोन श्वान पडले आणि अडकले होते. अश्या या श्वानांना तेथून सुखरूप कडून त्यांना जीवनदान देण्याचे काम कॅनिअन ऍनिमल रेस्क्यू अँड इम्पॅथ्स आणि अग्निशमन दलाच्या वतीने संयुक्तरित्या करण्यात आले.            

 प्रतिभानगर परिसर ते सुभाषनगर रस्त्या दरम्यान रस्त्याला लागुन असलेल्या भुयारी गटारीचे उघड्या चेंबर मध्ये दोन श्वान पडले. या भुयारी गटारीचे स्वच्छतेसाठी म्हणून असणाऱ्या चेंबर वर गवत वाढल्यामुळे हे पडलेले श्वान कोणालाही लक्षात आले नाहीत. शिवाय सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे रहदारी देखील कमी आहे. या भुयारी गटारीचे जाळे देखील मोठे असल्यामुळे हे श्वान आतल्या आताच घुटमळत होते.

कॅनिअन ऍनिमल रेस्क्यू आणि अग्निशमन दलाची संयुक्त कामगिरी 

या परिसरामध्ये असणाऱ्या भटक्या जनावरांना अन्न देण्यासाठी गेलेल्या प्रशांत साठे यांनी या श्वानांचा आवाज ऐकला आणि त्यांनी त्यांचा शोध घेतला. या नंतर त्यांनी स्वतःच्या रेस्क्यू टीमला पाचारण करत या श्वानांना तेथून बाहेर काढण्याच्या मोहिमेला सुरवात केली. यातच खूप रात्र होऊन देखील त्यांना बाहेर काढण्यात यश आले नाही. दुसऱ्या दिवशी परत अग्निशमन चे जवान घेऊन त्यांनी त्या ठिकाणी मोहिमेला सुरवात केली.

अंतर्गत दूरवर पसरलेल्या या भुयारी गटारी काही ठिकाणी लाकडी फळीने बंद करत त्यांनी या दोन्ही श्वानांना एका मर्यादित कक्षेत आणले. या सोबत त्यांनी अग्निशमनच्या  करत द्वारे वाऱ्याचा झोत एका बाजूने सोडण्यास सुरवात केली. असे उपाय करत त्यांनी या श्वानांना तेथून सुखरूप बाहेर काढले. या मोहिमेत कॅनिअन ऍनिमल रेस्क्यू अँड इम्पॅथ्ससंस्थेच्या प्रशांत साठे , अशिष खरबडे, मार्क गर्दे , गौरव तुंगतकर, स्वप्निल व अग्निशामक दलाचे जवान सहभागी झाले होते.

टेक्नॉलॉजी चा योग्य वापर

प्रसंगावधान आणि टेक्नॉलॉजी चा योग्य वापर  दूरवर पसरलेल्या या भुयारी गटारीमध्ये अडकलेल्या या श्वानाचा शोध घेण्यासाठी लाईट आणि कॅमेरा खाली खोल गटारीमध्ये ठेवण्यात आला होता. हा केमेरा मोबाईलशी जोडून या कॅमेरामध्ये दिसणारे दृश्यामुळे आतील परिस्थितीचा नेमका अंदाज लावला जात होता. या मुळे या श्वानांना वाचवण्यासाठी वापरण्यात आलेल्या टेक्नॉलॉजी आणि दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

SCROLL FOR NEXT