Lockdown announced in kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापूरकरांसाठी मोठी बातमी ; जिल्ह्यात सोमवारपासून लाॅकडाऊन जाहीर

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसें-दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. कोरोना वाढीचा दर हाताबाहेर जाण्याआधीच विचार करायला हवा. त्यामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.  जिल्ह्यात सोमवारपासून आठवडाभर लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केला. यासंदर्भातील मार्गदर्शक सुचना, नियम व अटी उद्या (ता. 18) जाहीर करण्यात येणार आहेत. 

दुपारी ऑनलाईन झालेल्या चर्चेमध्ये समिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, सायंकाळपर्यंत यावर निर्णय घेणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. त्यानुसार लाॅकडाऊनचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. लाॅकडाऊन कालावधीत दूध आणि ओषधे सोडून इतर सर्व बंद राहणार आहे. 

जिल्ह्यात कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. कोरोना वाढीचा दर हाताबाहेर जाण्याआधीच विचार करायला हवा. अशा काही नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर, कोरोनाचा उपचार घेणाऱ्या 665 जणांसाठी लॉकडाऊन करुन जिल्ह्यातील 38 लाख लोकांना क्वारंटाईन करणार का? असा सवाल दुपारच्या बैठकीत काहींनी उपस्थित केला होता. प्रत्येक दिवशी कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन गरजेचे आहे. असा एक मतप्रवाह होता. तर, 665 लोकांसाठी लॉकडॉऊन करणार का असाही सवाल उपस्थित केला जात होता. तसेच, सध्या 665 कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. तर एकूण 1338 लोकांना कोरोना झाला आहे. यामध्ये टेस्ट कमी झाले आहेत. त्या वाढवल्या पाहिजेत त्यामुळे काही कडक नियम करा, टेस्ट वाढवा, पण लॉकडाऊन आता जिल्ह्याला परवडणारे नाही, असाही एक मतप्रवाह होता. अखेर जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रभाव लक्षात घेऊन लाॅकडाऊन निर्णय जाहीर करण्यात आला.

आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी संवाद साधला. यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने आदि सहभागी झाले होते. या बैठकीतही बहुंताशी लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन करण्याच्या सुचना दिल्या तर काही लोकप्रतिनिधींनी पूर्ण लॉकडाऊन न करता यासंदर्भातील नियम व अटी अधिक कडक करण्याच्या सुचना दिल्या. लॉकडाऊनबाबत मत मत्तांतरे असल्याने याचा निर्णय सकाळच्या बैठकीत न होता पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना हे अधिकार देण्याचे ठरले. त्यानुसार सायंकाळी श्री. देसाई यांनी आठवडाभर लॉकडाऊन करण्यात येणआर असल्याचे जाहीर केले.  

.

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT