Kolhapur Loksabha Constituency
Kolhapur Loksabha Constituency esakal
कोल्हापूर

शिंदे गटाकडं असणाऱ्या 'या' मतदारसंघावर भाजप करणार दावा; वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली, महिन्यात चित्र होणार स्पष्ट

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. ही जागा भाजप कमळ चिन्हावर लढवण्याच्या तयारीत आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर (Kolhapur Loksabha Constituency) भाजप (BJP) दावा करण्याची दाट शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याविषयी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे आग्रह धरल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप ३० जागा लढवण्याचे नियोजन करत आहे. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडील काही जागा भाजप लढवणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. ही जागा भाजप कमळ चिन्हावर लढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या अडीच तीन वर्षांपासून यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

यामध्ये विधानसभानिहाय बूथरचना करणे, राज्य आणि केंद्राच्या योजनांचे लाभार्थी निश्चित करून त्यांच्याशी संपर्क करणे, विविध माध्यमातून समाजातील सर्व घटकांना संपर्क ठेवणे हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), समरजितसिंह घाटगे, चंदगड विधानसभा मतदारसंघातील शिवाजी गावडे, जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपापल्या भागामध्ये पक्ष बांधणी केली आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघातही भाजपचा मतदार वाढल्याचे पोटनिवडणुकीत दिसले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. महिन्याभरात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे पक्षातील पदाधिकारी सांगतात.

विकासकामांना प्राधान्य

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच विस्तारित विमानतळ सुरू होईल. थेट पाईपलाईन योजनेसाठीही केंद्राचा निधी उपलब्ध झाला आहे. रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण सुरू आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे.

केंद्रीय मंत्र्यांचे दौरे

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे आतापर्यंत चार वेळा कोल्हापुरात येऊन गेले आहेत. विविध उपक्रमांतून त्यांनी जनतेशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर मंत्री भारती पवार यांचाही दौरा झाला आहे. यावरून कोल्हापूर मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे विशेष लक्ष असल्याचे दिसते.

महायुतीची ताकद

राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, ए. वाय. पाटील यांचे मोठे गटही महायुतीला समर्थन देतील. यामुळे भाजपने लोकसभा जागेवरती दावा सांगितला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT