Hsc result sakal media
कोल्हापूर

HSC result 2021: बारावीच्या निकालात कोल्हापूरच्या मुलींची बाजी

कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.६७ टक्के; मुलींची बाजी

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : यंदा बारावीच्या निकालात कोल्हापूर विभागात(Kolhapur Division) मुलींनी उत्तीर्णतेत झेंडा फडकवला असून, कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.६७ टक्के लागला आहे. राज्यात कोल्हापूर विभाग निकालात चौथ्या क्रमांकावर आहे. सातारा जिल्हा (Satara Division) विभागात टाॅप, तर कोल्हापूर जिल्हा तृतीय स्थानावर आहे. यंदाच्या निकालात ७.२५ टक्के वाढ झाली आहे.

यंदा बारावीच्या निकालात कोल्हापूर विभागात मुलींनी उत्तीर्णतेत झेंडा फडकवला.

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यंदा बारावीची परीक्षा झाली नाही. दहावीतील परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुण व बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र, सराव व चाचण्या, अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक गुणांच्या आधारे मूल्यमापन करून निकाल आज जाहीर करण्यात आला. परीक्षेसाठी १ लाख १७ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १ लाख १७ हजार ३१७ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३८८ अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण झाले आहेत. ५१ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला आहे.

विभागनिहाय निकाल असा :

कोकण - ९९.८१

मुंबई - ९९.७९

पुणे - ९९.७५

कोल्हापूर - ९९.६७

लातूर - ९९.६५

नागपूर - ९९.६२

नाशिक - ९९.६१

अमरावती - ९९.३७

औरंगाबाद - ९९.३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price India : देशात नव्याने पेट्रोल-डिझेल दर जाहीर; कुठे स्वस्त, महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Koyna Dam: कोयनेच्या पाण्याचा मुंबईकडे प्रवास? सर्व्हेने पुन्हा रंगली चर्चा; हजारो कोटींचा खर्च, कोकणात चिंतेचे वातावरण

Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! जायकवाडी धरण ८० टक्के क्षमतेच्या उंबरठ्यावर; धरणात पाण्याची जोरदार आवक

MHADA: स्वप्नाच्या शहरात स्वत:चं घर! म्हाडाच्या घरांची लवकरच लॉटरी निघणार, विकसकांकडून ५,५०० घरे मिळणार; तयारी सुरू

Peru Plane Crash : पेरूमध्ये पर्यटकांचे विमान कोसळले, १३ जणांचा मृत्यू; नाझ्का लाइन्स पाहताना काळाने गाठले

SCROLL FOR NEXT