Raju Shetti MLA Satej Patil esakal
कोल्हापूर

'महाविकास आघाडीने राजू शेट्टींची कोणतीही फसवणूक केलेली नाही'; शेट्टींच्या भूमिकेवर काय म्हणाले सतेज पाटील?

‘माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) 'आमच्यासोबत यावेत यासाठी पहिल्यापासून प्रयत्न करीत होतो.'

सकाळ डिजिटल टीम

'कोल्हापूरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दंगली घडविण्याचे प्रकार सुरू केले जात आहेत. काही लोक जाणीवपूर्वक दंगली घडविण्याच्या प्रयत्नात आहेत.'

कोल्हापूर : ‘माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) आमच्यासोबत यावेत यासाठी पहिल्यापासून प्रयत्न करीत होतो. मात्र, त्यांना केवळ शिवसेनेचाच पाठिंबा हवा होता यामुळे ते इतर पक्षांशी बोलत नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांची फसवणूक केली म्हणणे चुकीचे असल्याचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी स्पष्ट केले. कसबा बावडा येथील त्यांच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीने राजू शेट्टी यांची कोणतीही फसवणूक केलेली नाही. शेट्टींनी आरोप केला का नाही मला माहीत नाही; मात्र मी पहिल्यापासून ते लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत यावेत यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत होतो. त्यांना महाविकास आघाडीमधून काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी केवळ शिवसेनेचा पाठिंबा हवा होता. त्यांची ही भूमिका शेवटी बदलली.

मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांनी लेखी स्वरूपात महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा. त्यांनी राज्यात देखील पाठिंबा द्यावा, अशी आमची अपेक्षा होती. ‘बुलढाणा’बाबत त्यांच्या अडचणी होत्या. त्यामुळे तिकीट अंतिम झाल्यावर मी राज्यातील कार्यकारिणीची भेट घेऊन निर्णय घेणार असे शेट्टी म्हणाले होते. यात खूप वेळ गेला आणि वरिष्ठ पातळीवर बरेच समज-गैरसमज झाले.’

आमदार पाटील पुढे म्हणाले, ‘कोल्हापूरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दंगली घडविण्याचे प्रकार सुरू केले जात आहेत. काही लोक जाणीवपूर्वक दंगली घडविण्याच्या प्रयत्नात आहेत. येथील शांतता बिघडावी यासाठी प्रयत्न होत आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत कोल्हापूरमध्ये दंगली घडविण्याचा प्रयत्न काही घटक करीत आहेत. हे रोखण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे. शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातून प्रचंड विरोध होत आहे. तरीही सरकारने अधिसूचना काढली आहे. याचा अर्थ हे सरकार ठेकेदारधार्जिणे आहे.’

सांगलीतील गैरसमज दूर होतील

‘सांगलीत आमदार जयंत पाटील आणि काँग्रेस नेत्यांमध्ये काही गैरसमज आहेत, पण ते लवकरच मिटतील. विधानसभेसंदर्भात अद्याप कोणताही फॉर्म्‍युला ठरलेला नाही. तो निर्णय राज्य पातळीवर घेतला जाईल. कोल्हापुरात काय फॉर्म्युला असेल हे देखील ठरलेले नाही. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष मिळून एकत्रित ठरवतील’, असेही पाटील यांनी सांगितले.

कायदा-सुव्यवस्था ढासळली

आमदार पाटील म्हणाले, ‘कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. अनेक प्रकरणे समोर येत आहेत. पोलिस यंत्रणा राजकीय यंत्रणेत अडकलेली दिसत आहे. दर दोन दिवसाला कोल्हापुरात एक खून होत आहे. तर कळंबा कारागृहात दर दोन दिवसाला नवनवीन गोष्टी सापडत आहेत. याकडे शासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ८ तासांच्या प्रतिक्षेनंतर जीवनवाहिनी पुन्हा सुरु

ISRO: 'इस्रो'कडून होतेय ४० मजली उंचीच्या यानाची निर्मिती; अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली सखोल माहिती

SCROLL FOR NEXT