maratha community protest in kolhapur hatkanangale 
कोल्हापूर

मराठा समाज समितीचे कार्यकर्ते आक्रमक ; आमदारांना भाषणास मज्जाव

सकाळ वृत्तसेवा

हातकणंगले (कोल्हापूर) - तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर आयोजित लाक्षणिक उपोषणावेळी पाठिंबा देण्यास आलेल्या आमदार राजूबाबा आवळे यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांनी त्यांना भाषण करण्यास मज्जाव करत प्रश्नांचा भडिमार केला.

साडेबाराच्या सुमारास आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आमदार राजूबाबा आवळे आले. या वेळी भाषण करण्यासाठी उभे राहताच त्यांना मज्जाव केला. सायंकाळी आंदोलनाची सांगता झाली. प्रास्ताविक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांनी केले. या वेळी सचिव भाऊसाहेब फास्के, बी. एम. पाटील, दयासागर मोरे, उपाध्यक्ष दीपक कुन्नूरे, पंडित निंबाळकर, तात्यासाहेब पाटील, ॲड. संग्रामसिंह निंबाळकर, सुनील काटकर, अमित गर्जे, दत्तात्रय पाटील, पंढरीनाथ ठाणेकर, बी. टी. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी उपसभापती दीपक वाडकर, नगरसेवक दीनानाथ मोरे, अभिजित लुगडे, माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, कोरोचीचे माजी सरपंच सुहास पाटील, सचिनकुमार शिंदे, दत्तात्रय संभाजी पाटील, अजित खुडे, स्वप्निल करडे, प्रल्हाद तालुगडे, अमर वरुटे, राजेंद्र वाडकर, संजय शिंदे, सुभाष पाटणकर, महादेव शिंदे, सुनील शिंदे, दीपक पोवार, तानाजी शिंदे, अविनाश शिंदे, शितल चव्हाण, सुनील भोसले, संतोष राशिवडे, गजानन खोत, दिलीप खोत आदी उपस्थित होते.आंदोलनास सभापती महेश पाटील, नगराध्यक्ष अरुण जानवेकर, नगरसेवक मयूर कोळी, रिपाइंचे अनिल कांबळे यांनी पाठिंबा दिला.

 
 
पाठपुरावा करण्याची ग्वाही

आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे आमदारांनी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र याच सरकारच्या काळात स्थगिती मिळाल्याचे सांगत आंदोलकांनी त्यांना निरुत्तर केले. आरक्षणप्रश्‍नी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी लावून धरतानाच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत  नोकरभरती करू नये. त्यावर आंदोलकांच्या भावना सरकारला कळविण्याची ग्वाही देत आमदार आवळे यांनी निरोप घेतला.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : मंडणगड साईनगर येथे ‘नाना - नानी पार्क’चे लोकार्पण

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

SCROLL FOR NEXT