maratha light infantry marathi tanaji malusare 
कोल्हापूर

इंग्रजांनीही जाणली होती मराठ्यांची ताकद ; छत्रपतींच्या राज्यातही गाजवले कर्तृत्व 

स्नेहल कदम

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून मराठी सैन्याला रोमहर्षक परंपरेचा इतिहास आहे. इंग्रजांना मराठ्यांची ताकद समजल्यानेच त्यांनी 1768 साली 'बॉम्बे सिपॉय' म्हणून पहिली पलटण सुरू केली. नंतर त्याचे 'मऱ्हाटा' म्हणून नामकरण झाले. याच 'मऱ्हाटाचे पुढे मराठा झाले. देशातील सर्वात जुनी रेजिमेंट म्हणून मराठा इन्फंट्रीकडे पाहिले जाते. आज 'मराठा डे' म्हणजेच 'मराठा लाईट इन्फन्ट्री'चा स्थापना दिवस आहे. सर्वात जुनी इन्फंट्री म्हणून ही ओळखली जाते. खासदार संभाजी राजे छत्रपती यांनीही आज या गाैरवशाली इतिहासाची आठवण करून देत आपल्या फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. 


गतवर्षी मराठा इन्फंट्रीला २५० वर्ष पूर्ण झाली. प्रत्येक इन्फंट्रीचा एक इतिहास असतो, गौरवशाली परंपरा असतात. स्वातंत्र्यपूर्व काळात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात अनेक देशांमध्ये मराठा सैनिकांनी आपले शौर्य दाखवून दिले. मराठा इन्फंट्रीमधील सर्वच बटालियननी शौर्य आणि गनिमी काव्यामुळे प्रत्येक युध्दात आपला पराक्रम गाजवला आहे. 1965 व 1971 युद्धात आपले वेगळे स्थान निर्माण केले. श्रीलंकेतील वंशिक संघर्षात व कांगोसारख्या देशात शांतीसेनेतही त्यांनी अपूर्व कामगिरी केली. तसेच 1999 मध्ये कारगिल युद्धातही रोमहर्षक विजय मिळविण्यात मोठा वाटा होता. त्यात अनेक जवान शहीद झाले. छत्रपती शिवरायांच्या आदेशाने तानाजी मालुसरेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी कोंढाणा जिंकला, ती लढाई 'मराठा लाईट इन्फंट्री'ची मूळ प्रेरणा आहे. तोच दिवस मराठा दिवस म्हणून साजरा केला जातो. करवीर छत्रपतींना आजही या रेजिमेंटचे मानद, 'कर्नल ऑफ दी रेजिमेंट' म्हणून सर्वोच्च मानाचं पद दिल जातं. 

मराठा लाइट इन्फंट्रीत एकूण 30 बटालियन्स असून त्यामधील 21 मराठा बटालियन म्हणूनच ओळखल्या जातात. तर तीन बटालियन्स राष्ट्रीय रायफल्समध्ये समाविष्ट असून दोन प्रादेशिक सेनेशी संलग्न आहेत. दोन बटालियन्स मीडियम रेजिमेंट व एक बटालियन आयएनएस मुंबई या युद्ध नौकेशी संलग्न आहे. यासह वायुसेनेच्या ताफ्यातही एक बटालियन कार्यरत आहे.

 वॉर मेमोरियलच्या माध्यमातून मराठा इन्फंट्रीचा पराक्रम जपला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांसह ब्रिटिश काळातील गणवेश, त्यानंतर गणवेशामध्ये होत गेलेले बदल, जुनी व नवी हत्यारे तलवारी आदी या ठिकाणी संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत. मराठा इन्फंट्रीने युद्धकाळात केलेली कामगिरी, धारातीर्थी पडलेले भारतीय जवान, ठार करण्यात आलेल्या अतिरेक्‍यांसह अन्य देशांच्या जवानांची छायाचित्रे या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

मराठा इन्फंट्रीने पहिल्या महायुद्धात दोन व्हिक्‍टोरिया पदके मिळविली. हा ब्रिटिशकाळातील सर्वोच्च युद्ध पुरस्कार होता. नाईक यशवंत घाटगे व शिपाई नामदेव जाधव यांनी हा सर्वोच्च सन्मान मराठाला मिळवून दिला. या दोन्ही योद्‌ध्यांचा इतिहास व कामगिरी वार मेमोरियलमध्ये आजही पाहावयास मिळते.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहली, रोहित शर्मा Vijay Hazare Trophy त खेळून किती रुपये कमावणार? दोघांना इथेही लॉटरीच...

Explained : इटलीत बंद पाडलेली विषारी 'यंत्रणा' रत्नागिरीत... कोकणचं भविष्य धोक्यात?, PFAS काय आहे? Italy मध्ये काय घडलं होतं?

Mumbai Crime: वर्दीला कलंक ! मुंबईत गजबजलेल्या उद्यानात पोलिस अधिकाऱ्याचे गतीमंद महिलेसोबत अश्लील कृत्य, नागरिकांनी बेदम चोप दिला अन्...

Pune Scam : पुणेकरांनो अलर्ट! मोबाईलवर RTO कडून आलाय ई-चलनचा मेसेज? आता बँक अकाऊंट होईल रिकामं..नेमका फ्रॉड काय पाहा

Satara News: अभिजीत बिचुकलेंचा नवा विक्रम! जुन्या मतांच्या रेकॉर्डला टाकले मागे, अपक्ष उमेदवारांच्या यादीत मिळवले दुसरे स्थान..

SCROLL FOR NEXT