Maratha Reservation Maratha community in Kolhapur esakal
कोल्हापूर

Maratha Reservation : '..तर मराठा समाज सरकारला धूळ चारेल'; इशारा देत मराठा बांधवांचा जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा

शासनातील सदस्यांनी मनोज जरांगे-पाटील व मराठा समाजासंदर्भात बेताल वक्तव्ये करू नयेत.

सकाळ डिजिटल टीम

जरांगे-पाटील यांनी चौथ्या टप्प्यातील उपोषण सुरू केले आहे. त्यास पाठिंबा देण्याकरिता मराठा बांधव शाहू समाधी स्मारक परिसरात एकत्र आले.

कोल्हापूर : शासनातील सदस्यांनी मनोज जरांगे-पाटील व मराठा समाजासंदर्भात बेताल वक्तव्ये करू नयेत, असा इशारा सकल मराठा समाजाने येथे दिला. जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणास समाजाने पाठिंबा दिला. तसेच, मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्‍न मार्गी न लावल्यास मराठा समाज एकत्रितपणे शासनाला धूळ चारेल, असा इशारा दिला. नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक परिसरात मराठा बांधव जमले होते.

जरांगे-पाटील यांनी चौथ्या टप्प्यातील उपोषण सुरू केले आहे. त्यास पाठिंबा देण्याकरिता मराठा बांधव शाहू समाधी स्मारक परिसरात एकत्र आले. यावेळी चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ मराठा समाज आरक्षणापासून वंचित असून, त्यास सत्तेच्या वळचणीस असलेले मराठा राज्यकर्ते कारणीभूत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांना शब्द दिला होता. तो सोयीस्कररित्या मोडला आहे.

मागील लोकसभेत उच्चांकी बहुमत असतानाही देशातील विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण कायदा त्यांनी पारित केलेला नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या जागेपैकी ३३ टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवाव्यात. अन्यथा मराठा आरक्षणासोबत या आरक्षणाची लढाईही महाराष्ट्रात सुरू होईल, असा इशारा दिला.

विजय देवणे, अॅड. बाबा इंदुलकर, अॅड. चारुशिला चव्हाण, सुनीता पाटील, अनिल घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. बाबा पार्टे, आर. के. पोवार, अॅड. निशिकांत पाटोळे, अॅड. सतीश नलवडे, अॅड. चंद्रकांत कुरणे, अनिल घाटगे, सुभाष जाधव, प्रा. आनंदराव पाटील, बाबा महाडिक, रुपेश पाटील, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT