Martyrs Memorial Day sakal
कोल्हापूर

sangli : हुतात्म्यांच्या स्मृतिदिनी वाळव्यात अनास्था!

प्रशासकीय औपचारिकता आणि राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर, सांगली : १० सप्टेंबर १९४२ चा हुतात्मा स्मृती दिन आज येथे कोणत्याही जाहीर कार्यक्रमाशिवाय पार पडला. त्यानिमित्ताने प्रशासकीय पातळीवर औपचारिकता आणि पदाधिकारी पातळीवर अनास्था दिसून आली आहे. एरवी प्रत्येकवेळी क्रांतीची पार्श्वभूमी सांगणाऱ्या वाळवा तालुक्यातील नेत्यांना हा दिवस साजरा करावासा वाटू नये हे दुर्दैवी चित्र आज पुढे आले. सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांनी आज येथील भेटीत त्याबाबत खंत व्यक्त केली.

महात्मा गांधी यांनी आठ ऑगस्टला जी 'चले जाव'ची घोषणा केली, त्याची प्रतिक्रिया म्हणून 'करेंगे या मरेंगे' या भावनेतून वाळवा तालुक्यातील तहसील कार्यालयावर १० सप्टेंबरला मोर्चा निघाला होता. या मोर्च्यात उमाशंकर रेवाशांकर पंड्या व विष्णू भाऊ बारपटे हे दोन तरुण शहीद झाले. वाळव्याच्या क्रांतीच्या इतिहातील महत्वाची घटना म्हणून ही नोंद आहे. कोरोनाकाळ वगळता अगदी अलिकडेपर्यंत या दिवशी मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे केले जात होते. या शहिदांच्या आठवणी जपून नव्या पिढीला त्यांचा प्रेरणादायी इतिहास ज्ञात व्हावा आणि त्यांच्या योगदानाची दखल घेणे हा त्यामागचा हेतू यंदा मात्र बाजूला पडला आहे.

प्रशासकीय पातळीवर केवळ फुलांचा हार वाहून आणि शहीद कुटुंबियांना सन्मानित करून हा दिवस साजरा केला गेला आहे. तर ज्या हुतात्मा स्मारकात हा दिवस साजरा केला जायचा त्याठिकाणी तर आज चक्क कुलूप होते. सध्या प्रशासकीय कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी प्रशासकांकडे आहे. इतरवेळी पदाधिकारी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना एकत्र करून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करतात. आता आपल्याकडे पद नाही तर हा दिवस साजरा करू नये, हीच त्यामागची धारणा असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. प्रश्न त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा नाही. त्यामागील आदर, भावनेचा आहे. निवडणूका आल्या की जो-तो आपल्या तालुक्याला असलेल्या क्रांतीचा, परंपरेचा, सैनिक-शहिदांचा इतिहास सांगतो आणि आपले ज्ञान ऐकवतो, मग अशावेळी ही भावना कुठे जाते? हा मोठा प्रश्न आहे. सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार आज काहीतरी कार्यक्रम असेल या भावनेने आलेले, पण इथली परिस्थिती पाहून ते हतबल होत त्यांनी खेद व्यक्त केला.

हुतात्म्यांच्या स्मृती विसरल्या जाणे हे खेदजनक तर आहेच, परंतु त्रासदायक आहे. नव्या पिढीला आपण कोणता वारसा सांगणार आहोत? हे यातून दिसत आहे."

भाई संपतराव पवार, सामाजिक कार्यकर्ते.

"कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात शहिदांच्या कुटुंबियांसमवेत चर्चा केली; परंतु वयोमानामुळे कार्यक्रमाला येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरीच जाऊन सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविले व पंचायत समिती, हुतात्मा स्मारक व पालिकेच्या आवारातही मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Muncher Municipal Result:'मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे'; आमदार शरद सोनवणेंनी फुगडीतून व्यक्त केला आनंद..

राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष! एम.कॉम.चे शिक्षण घेणारी २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

Marathwada Sahitya Sammelan: ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे; बीड जिल्ह्यात हाेणार संमेलन!

Nagaradhyaksha Election Poll Results : नगराध्यपदाच्या निकालानंतर अजित पवार गटाच्या नेत्याने टोचले स्वत:च्या पक्षाचे कान; म्हणाले, आत्मचिंतनाची गरज!

SCROLL FOR NEXT