Arun-Lad 
कोल्हापूर

'‘त्यांचे’ अवसान राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरच'

सकाळ वृत्तसेवा

कडेगाव (सांगली) : राष्ट्रवादी कुंडल (Kundal) पुरतीच मर्यादित आहे असे म्हणणाऱ्यांनी विधानसभा निवडणुक का लढविली नाही. आजवर ते राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने लढले. त्यांचे अवसान राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरच होते. हे ते विसरले आहेत असा टोला आमदार अरुण लाड यांनी पृथ्वीराज देशमुख यांना लावला. कडेपूर (ता.कडेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, जि.प.गटनेते शरद लाड, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव, कडेगाव तालुकाध्यक्ष जयदीप यादव आदी उपस्थित होते. (mla-arun-lad-criticism-on-prithviraj-deshmukh-sangli-political-news)

ते म्हणाले,‘‘ १९९५ पासून आम्ही त्यांना साथ दिली. त्यांना आमदार करण्यासाठी आम्ही निस्वार्थीपणे योगदान दिले. आता तेच आमच्यावर टीका करीत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून कडेगाव तालुका राष्ट्रवादीमय करुया. सध्याच्या कोरोना महामारीतही भाजप मात्र राजकारणात गुंतला आहे. मराठा व ओबीसी आरक्षणावरून ते दिशाभूल करीत आहेत. सत्तेविना वैफल्यग्रस्त भाजप नेते केंद्रातील सत्तेचा गैरवापर करीत असून महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडी,सीबीआयची भिती घालत आहे. मात्र जनता हे ओळखून आहे. जिल्ह्यासह पलूस-कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादी बलवान होत आहे.’’

शरद लाड म्हणाले,‘‘ कडेगाव तालुक्यात पालकमंत्री जयंत पाटील व आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची भक्कम बांधणी करूयात.’’ तालुकाध्यक्ष जयदीप यादव यांनी स्वागत केले. पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक व महिला जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव यांचा सत्कार झाला. यावेळी बाबासाहेब मुळीक,बाळासाहेब पाटील,पूजा लाड,वैशाली मोहिते,सुरेश शिंगटे,बाळासाहेब वत्रे,रामभाऊ निर्मळ,रमेश एडके आदी उपस्थित होते.

लवकरच भाजपला भगदाड

जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले,‘‘ सध्या भाजपमध्ये गेलेल्यांना राष्ट्रवादीनेच बळ दिले. आमचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यामुळेच त्यांना चांगले दिवस आले. ते विसरले तरी जनता विसरलेली नाही. कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचा पाया भक्कम असून इथे पक्ष मुसंडी मारेल. भाजप नेत्यांना भगदाड पडलेलेही कळणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT