Moka action against kolhapur kishore makadwala gang 
कोल्हापूर

कोल्हापुरात संघटित गुन्हेगारीला दणका ; "किशोर माकडवाला गॅंग' विरूद्ध मोका 

राजेश मोरे

उजळाईवाडी - खंडणी प्रकरणातील "किशोर माकडवाला गॅंग' विरोधात पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली. गॅंग प्रमुख किशोर मानेसह सहा जणांचा यात समावेश आहे. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यामार्फत टोळीविरोधात दाखल झालेल्या प्रस्तावास आज विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. त्यानुसार संबधित टोळी विरोधात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

मोका अंतर्गत कारवाई केलेल्या संशयितांची नावे ः टोळी प्रमुख किशोर दडाप्पा माने (रा. शिवाजी पार्क), राकेश बाळू कांबळे (रा. कदमवाडी), विशाल जयसिंग मछले (रा. कसबा बावडा), इरफान सिकंदर शेख (रा. राजेंद्रनगर), किरण दडाप्पा माने (रा. साळोखे पार्क), राहूलसिंग तुफानसिंग दुधाणे (रा. विचारे माळ) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, जामिऊल अन्सरूल हक (वय 39) हे मुळचे वेस्ट बंगालचे आहेत. सध्या ते तामगांव येथे राहतात. ते लेबर कॉन्ट्रक्‍टर आहेत. संशयितांनी हक यांना 28 ऑगस्ट 2020 ला रात्री अडवले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून चंदगड, गोकुळ शिरगाव, इस्लामपूर येथे नेले. तू बाहेरील राज्यातून कंपनीत कामगार पुरवतोस, आम्हाला हाफ्ता दे अशी मागणी केली. त्यानंतर त्यांच्याकडील सोन्याचा ऐवज व रोकड असा किमंती ऐवज चाकूचा धाक दाखवून मारहाण करून जबरदस्तीने काढून घेऊन खंडणी मागीतली. अशी फिर्याद हक यांनी दिली. त्यानुसार गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात या गॅंग विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संशयितांवर किरण माने सोडून इतरांवर कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केला. यात संशयित किशोर माने व त्याचे साथिदार 2011 पासून संघटित गुन्हेगारीमध्ये सक्रीय असल्याचे पुढे आले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी संबधित टोळीवर मोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी संबधित टोळीविरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार केला. त्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक लोहिया यांनी मंजुरी दिली. 

टोळीतील संशयितावर शाहूपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूवाडी आदी कार्यक्षेत्रात 20 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात खूनाचा 1, अपहरणासह खंडणीचे 2, दुखापतीसह जबरी चोरीचे 5, जबरी चोरीचे 3, दरोडा 1 आदी गुन्ह्यांचा समावेश असल्याचे सावंत यांनी सांगितले. 


 पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दलेल्या आदेशानुसार संघटित गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. तिचा वेळीच बिमोड केला जाईल. 
 

-सुशांत चव्हाण. सहायक पोलिस निरीक्षक 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025 : लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप ! दुसऱ्या दिवशीही राज्यासह देशभरात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह

Sunday Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात कमी वेळेत बनवा बटाटा अन् रव्यापासून स्वादिष्ट पुरी, लगेच नोट करा रेसिपी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन

आजचे राशिभविष्य - 7 सप्टेंबर 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT