कोल्हापूर

लई भारी पंचवीसहून अधिक ब्रॅंडना  आजीबाईच्या बटव्याचा आधार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भारतीय संस्कृती, आयुर्वेद आणि आजीबाईचा बटवा हे एक समीकरणच. मात्र, बदलत्या काळाबरोबर विस्मृतीत निघालेल्या आजीबाईच्या बटव्याला पुन्हा महत्त्व आले आहे. आरोग्यदायी विविध काढ्यांना मागणी वाढली आहे. काढ्याची हीच रेसीपी विविध ब्रॅंडेड चहाच्या माध्यमातून शहरात 25 हून अधिक ठिकाणी उपलब्ध झाली आहे. 
दरम्यान, चहाची सवय वाईट असते, असा काहींचा समज असला तरी या प्रत्येक ब्रॅंडने आपल्या वैशिष्ट्यांचे प्रमोशन करताना चहा आरोग्यदायी कसा आहे, हे सांगण्यावर भर दिला आहे. रावजी, पंढरपुरी चाय, शेठजी चाय, येवले चहा, हर्बल टी, आईस टी, टी केटली, हरमन टी, मोरया चहा, प्रेमाचा चहा, आपुलकीचा चहा, सुप्रसिद्धः, सलगर अमृततुल्य, करवीर अमृततुल्य, फौजी चहा असे चहाचे विविध ब्रॅंड आणि फ्रॅंचाईजी सुरू आहेत. ही यादी अपडेट करायची म्हटले तरी एखादे नाव विसरून जाईल, असे सध्याचे चित्र आहे. मात्र, या प्रत्येक घटकाने आयुर्वेदीय घटकांचा चहात समावेश केला आहे. 
तुळस, पुदिना, आले यांचा काढा घेतल्याने शरीराला विशेष ऍन्टिऑक्‍सिडंट मिळतात. त्यामुळे शरीरातील विषारी घटक नष्ट होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील चरबी कमी होते. रक्तातील शर्करेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. आम्लपित्त होणाऱ्यांनी पुदिन्याचे पान पाण्यात उकळून ते पाणी घेतल्याने बराच फरक पडतो. तुळस, आले, वेलची, गवती चहा टाकून चहा घेतल्याने सर्दी-खोकल्यापासून दूर राहण्यास मदत मिळते. मायग्रेन व सायनसचा त्रास असल्यास ही पेये लाभदायी ठरतात. असे विविध आयुर्वेदीय घटकांचे औषधी गुणधर्म वेगवेगळे आहेत आणि या साऱ्या औषधी वनस्पती टेरेसवर, परसबागेत लावून त्यापासून आरोग्यदायी काढा घरच्या घरी करण्यावरही आता भर दिला जात आहे. 

आरोग्यदायी काढा... 
5 जून पर्यावरण दिनानिमित्त "सकाळ'च्या "पर्यावरण जपूया, निरोगी जगूया' या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. घरच्या घरी रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, त्यासाठी आहारात औषधी वनस्पतींचा वापर कसा करावा, अशा विविध अनुषंगाने या मोहिमेतून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मंथन घडविले जात आहे. परसबागेत किंवा उपलब्ध जागेतील कुंड्यात लावलेल्या विविध औषधी वनस्पतींचा आरोग्यदायी काढा सर्वच वयोगटांसाठी उपयुक्त ठरतो. त्याची रेसीपी पाहण्यासाठी शेजारी दिलेला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT