mother said in case of daughter suicide because her husband and his mother in kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

पती आणि सासूच्या छळामुळेच माझ्या मुलीने केली आत्महत्या ; आईने केला खुलासा

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : जांभळी (ता. शिरोळ) येथील आईने दोन मुलींसह आत्महत्या केल्याप्रकरणी मृत सुप्रियाची आई सुवर्णा शिवाजी डांगे (जांभळी) यांनी मुलीची सासू व पतीच्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पती शिवाजी रघुनाथ भोसले व सासू विमल रघुनाथ भोसले (यादव मळा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

जांभळी येथे आईने दोन मुलींसह मंगळवारी आत्महत्या केली. पोलिसांनी पती शिवाजी याचा जबाब नोंदवला. पोलिसांनी पीडित भोसले कुटूंब, मृत सुप्रियाचे मामा, आई-वडील तसेच इतर ठिकाणी गोपनीय चौकशी सुरू ठेवली. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या भेटीनंतर सुप्रियाच्या आईने गुरुवारी शिरोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पती शिवाजी याचा सुप्रियाशी पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्याने पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रेमविवाहानंतर सुप्रियाला दोन वर्षे त्रास दिला नाही. त्यानंतर तुझ्या आई-वडिलांनी लग्नानंतर काहीच दिले नाही म्हणून शारीरिक, मानसिक त्रास देऊन हुंडा आणण्याची मागणी सुरू केली. या त्रासाला कंटाळून तिने मुलींसह आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT