कोल्हापूर

जिद्दीला सलाम! कोल्हापुरची अवघ्या वीस वर्षाची कस्तुरी असंख्य आव्हाने झेलत कॅम्प दोनवर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest)सर करण्यासाठी आसुसलेली करवीरकन्या कस्तुरी सावेकर (Kasturi Savekar)आजही असंख्य आव्हाने झेलत कॅम्प दोनवर पाय घट्ट रोवून उभी आहे. दोन दिवसात वातावरण सुरळीत झाले तर कस्तुरी व टीम पुढील चढाई करणार आहेत. मात्र, आता या साऱ्या गोष्टी निसर्गावरच अवलंबून आहेत. दरम्यान, कॅम्प दोनवर सध्या असलेल्या गिर्यारोहकांमध्ये (mountaineer)कस्तुरी सर्वात लहान असून तिच्या जिद्दीचे सर्वच स्तरातून कौतुक होवू लागले आहे.mountaineer-kasturi-savekar-mount-everest-climb-musk-camp-two-facing-numerous-challenges-kolhapur-news

नेपाळचा अधिकृत विभाग, बेसकॅम्प वरून बाबू शेर्पा, कॅम्प दोनवरून जितेंद्र गवारे व ‘गिरीप्रेमी‘चे एव्हरेस्ट मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे यांच्याकडून मिळालेली माहिती अशी, कॅम्प दोनवर प्रचंड स्नो फॉल, पाऊस व प्रचंड वारा वहात आहे. पन्नास फूटाच्या पुढचे काहीही दिसत नाही. रहाण्यासाठीचे तंबू, कपडे ओले झाले आहेत. खाण्याचे साहित्य संपत आले आहे. स्नो फॉलमुळे बेसकॅम्पवरून खाण्याचे साहित्य वर येऊ शकत नाही. बेस कॅम्पवरचे तंबूही फाटले आहेत व जमिनही खचत चालली आहे. कॅम्प दोनवरील शेर्पा वर जाण्याच्या मनस्थितीत नाहीत. कारण रोप बर्फाखाली गाडले गेले आहेत. कॅम्प दोनवर अजूनही गिर्यारोहक आणि शेर्पा असे तीनशे लोक आहेत.

धीर, संयम अन् आत्मविश्वास...

विशेष कौतुक म्हणजे कस्तुरीने आतापर्यंत घेतलेले कष्ट गर्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूटमध्ये केलेले कोर्सेस याचा फायदा कस्तुरीला होत आहे. पंचवीस हजार फूट उंचीवर वाऱ्याशी सामना करून चढाई करणे व तीन रात्र तिथे राहून पुन्हा एकवीस हजार फूटावर खाली येऊन तीन दिवस राहणे व पुढील चढाई साठी मानसिक व शारीरीक ताकदीने तितकेच फिट राहणे हे भल्या भल्या गिर्यारोहकांना जमत नाही. तेथे कस्तुरी धिराने संयमांने तितक्याच आत्मविश्वासाने सर्व परिस्थितीशी सामना करत वेदर विंडोची वाट पहात आहे, हे खरोखर दाद देण्यासारख्या प्रतिक्रिया आज गिर्यारोहन क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केल्या.

माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात हवामानामुळे इतकी खराब परिस्थिती मी कधीही पाहिलेली नाही. आधी आलेले तोक्ते चक्री वादळ, आताचे यास वादळ आणि येऊ घातलेला मान्सून या सर्वांचा एव्हरेस्ट येथे खूपच विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पहिल्या दोन विंडोनंतर अंतिम शिखर चढाईसाठी वातावरणाची साथ मिळत नाही. असे फार क्वचित होते. वातावरण सुरळीत होवून सर्वांचे समिट व सुखरूप परत येण्यासाठी प्रार्थना करूया.

- उमेश झिरपे, मोहिमप्रमुख

जगभरातील भले भले गिर्यारोहक माघारी परतत असताना कोल्हापूरची अवघ्या वीस वर्षाची कस्तुरी अजूनही कॅम्प दोनवर पाय घट्ट रोवून उभी आहे. अनेक आव्हांनाचा सामना ती करते आहे आणि इथेच खऱ्या अर्थाने ती जिंकली आहे. ही गोष्ट तमाम कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची आहे. प्रचंड वारा, हिम वर्षाव, पावसातही तिची जिद्द कायम आहे. दोन दिवसात वातावरण सुरळीत होवून तिचे समिट होवून ती सुखरूप परत येण्यासाठी प्रार्थना करूया.

- डॉ. अमर अडके, अध्यक्ष, कोल्हापूर डिस्ट्रीक्ट माऊंटेनिरींग असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT