MP Dhananjay Mahadik Diwali Festival esakal
कोल्हापूर

Mahadik Family Diwali : माहोल दिवाळीचा, पण चर्चा निवडणुकांची; महाडिकांच्या फराळाला कोण-कोण नेते उपस्थित?

खासदार धनंजय महाडिक यांनी महासैनिक दरबार हॉल येथे दिवाळी फराळाचे (Diwali Festival) आयोजन केले होते.

सकाळ डिजिटल टीम

महाडिक कुटुंबाच्या वतीने दरवर्षी दिवाळी फराळाचे आयोजन केले जाते. याही वर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी महासैनिक दरबार हॉल येथे दिवाळी फराळाचे (Diwali Festival) आयोजन केले होते. यानिमित्ताने जिल्ह्यातील राजकारणी, सहकारातील कार्यकर्ते, उद्योजक, व्यावासायिक आणि विविध पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले होते.

एका बाजूला श्रवणीय संगीत, दिवाळीच्या फराळाचे विविध जिन्नस आणि त्या जोडीला रंगलेल्या राजकीय चर्चा असा अनोखा माहोल या निमित्ताने सर्वांना अनुभवायला मिळाला. महाडिक कुटुंबाच्या वतीने दरवर्षी दिवाळी फराळाचे आयोजन केले जाते. याही वर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

एकीकडे फराळाच्या पदार्थांचा आस्वाद घेत राजकीय चर्चा रंगल्या होत्या. कार्यकर्त्यांच्यात विविध निवडणुकांची चर्चा रंगली होती. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, अण्णासाहेब जोल्ले, आमदार राजेश पाटील, राजेश क्षीससागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, भरमूअण्णा पाटील, माजी खासदार निवेदिता माने, समरजितसिंह घाटगे, अरुंधती महाडिक, स्वरूप महाडिक.

तसेच पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, विजय जाधव, राहुल चिकोडे, महेश जाधव, यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. शास्त्रीय संगीताने वाढवली रंगत सचिन जगताप (बासरी), केदार गुळवणी (सतार, व्हायोलीन), संजय साळोखे (ऑक्टोपॅड), अनिकेत ससाणे (तबला), आकाश साळोखे (कि बोर्ड) यांच्या जुगलबंदीने मैफलमधील रंगत वाढवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT