MP Mandalik approached the Foreign Minister to get rid of the devotees stranded in Tehran
MP Mandalik approached the Foreign Minister to get rid of the devotees stranded in Tehran 
कोल्हापूर

'त्या' 44 कोल्हापुरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - तेहरान येथे अडकलेल्या ४४ भाविकांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी परराष्ट्रमंत्र्यांशी संपर्क साधला. जिल्ह्यातील सुमारे ४४ पर्यटक इराक आणि इराण परिसरात धार्मिक तीर्थक्षेत्राला गेले असता तेहरान येथे अडकून पडले आहेत. मंडलिक यांनी तातडीने परराष्ट्रमंत्र्यांशी संपर्क साधून सर्वांची तेहरान येथून लवकर सुटका व्हावी, अशी मागणी केली. तसे पत्रही त्यांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्र्यांना पाठविले आहे. त्यामुळे लवकरच कार्यवाही होण्याची शक्‍यता आहे.

कोल्हापूर व परिसरातील हे सर्व भाविक वयस्कर

कोरोना विषाणूमुळे सर्व देशांनी सतर्कता बाळगल्याने त्याचा फटका परदेशी पर्यटन करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. इराण आणि इराकमध्ये दरवर्षी हजारो धार्मिक यात्रेसाठी जात असतात. यंदा कोल्हापूर व परिसरातून सुमारे ४४ पर्यटक धार्मिक तीर्थक्षेत्रासाठी साद ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून तेहरानला गेले. पण, कोरोना विषाणूच्या भीतीने तेथील सीमा बंद केल्याने भाविक अडकले आहेत. संसर्गाच्या भीतीने विमानांना येण्या-जाण्यावर निर्बंध घातल्याने तेहरानमध्ये सर्व भाविक अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी मंडलिक यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. कोल्हापूर व परिसरातील हे सर्व भाविक वयस्कर असून, त्यांनी नेलेली औषधे व अन्य साहित्य संपत आल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यांचे नातेवाईक सर्व प्रवाशांच्या सुरक्षित परत येण्याच्या चिंतेमुळे त्रस्त झाले असून, त्यांना लवकर भारतात पाठवावे, अशी मागणी मंडलिक यांनी केली. याबाबत लवकरच कार्यवाही करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT