"MR" Club Winner In Volleyball Tournament In Gadhinglaj Kolhapur Marathi News
"MR" Club Winner In Volleyball Tournament In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजमधील व्हॉलीबॉल स्पर्धेत "एमआर" क्‍लब विजेता

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात यजमान एमआर शुटिंग क्‍लबने कडगाव संघाचा 28 -1 असा सहज फडशा पाडत विजेतेपदासह रोख 7 हजार रुपये आणि जय गणेश चषक पटकाविला. चौफेर कामगिरी करणारे रफिक मुल्ला स्पर्धावीर ठरले. स्थानिक सेव्हन शुटर्स क्‍लबला तिसऱ्या तर आर्दश संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. येथील एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर प्रकाशझोतात झालेल्या स्पर्धेत 20 संघानी सहभाग घेतला. 

एकदिवसीय स्पर्धेचे प्रविण नेसरीकर, प्रविण माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन झाले. अंतिम सामन्यात यजमान एमआर संघाने कडगाव संघाला प्रतिकाराची एकही संधी दिली नाही. रफिक मुल्ला यांनी आक्रमक खेळ करुन कडगावला नामोहरम करत 21-8 अशा दणदणीत विजयासह एमआरच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण झाले. जय गणेश ग्रुपचे अध्यक्ष आप्पा शिवणे, प्रकाश तेलवेकर, बाळू भैस्कर, राजू मोहिते, सर्जेराव सावंत, बबन कळेकर यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघाना रोख बक्षीसासह चषक दिले. संजय बरगे याला उत्कष्ट नेटमन, तर बचावपटू म्हणून जगदिश गावित यांचा सत्कार झाला. दरम्यान, एमआरने सेव्हन शुटर्सला, तर कडगावने आदर्श क्‍लबला पराजित करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. संयोजक संदिप भोसले यांनी आभार मानले. 

सुसज्य मैदानाची उभारणी 
जिल्हा परिषदेच्या एम. आर. हायस्कुलच्या सहकार्याने येथील एम. आर. शुटींग क्‍लबच्या खेळाडूंनी व्हॉलिबॉलसाठी सुसज्य मैदानाची उभारणी केली आहे. गेले पंधरा दिवसापासून मातीचा आधिक भराव टाकून सपाटीकरण केले. मैदानाभोवती अत्याधुनिक एलईडी प्रकाशझोताची कायमस्वरुपी सोय केली आहे. त्यामुळे सरावासाठी खेळाडूंना याचा लाभ होणार आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT