Municipal Corporation will plant 15 thousand trees
Municipal Corporation will plant 15 thousand trees 
कोल्हापूर

नियोजन ठरले..महापालिका लावणार 15 हजार झाडे

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने यावर्षी 15 हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याबाबत उद्यान विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी आज घेतला. 

महापौर आजरेकर म्हणाल्या," शहरातील जी धोकादायक झाडे आहेत. त्यापासून दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारीची घ्यावी. महापालिकेतर्फे लावण्यात येणाऱ्या 15 हजार वृक्ष लागवडीचे काय नियोजन केले आहे. तसेच आमदार ऋतूराज पाटील मोठया उंचीची 2 हजार झाडे देणार आहेत. ही झाडे लावण्यासाठी खड्डे मारुन घ्या.

शहरातील आयआरबीचे ट्रिगार्ड असेलेली झाडे मोठी झाली आहेत. ते ट्रिगार्ड व महापालिकेची लोखंडी ट्रिगार्ड काढून ते नव्याने लावण्यात येणाऱ्या झाडांना वापरावेत. शहरातील उद्योजक, निसर्ग प्रेमी, सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी यांनी खड्डे मारण्यासाठी लोकसहभागातून जेसीबी देऊ इच्छीतात त्यांनी ते देऊन महापालिकेस सहकार्य करावे. तसेच महापालिकेने लावलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी पुढे यावे.'' 

शहर अभियंता नेत्रदिप सरनोबर म्हणाले,"" महापालिकेने शहरातील 90 टक्के धोकादायक झाडांच्या छाटणीचे काम पूर्ण केले आहे. वृक्षारोपण उद्यान, ओपनस्पेस, बाजूपट्टी याठिकाणी करण्यात येणार आहे. यामध्ये वड, पिंपळ, उंबर, अर्जुन, हिरडा, बहावा, हेळा, काटेसावर, कवट, आपटा, जांभूळ, बेल, आवळा, बेहडा, बकुळ, कडुलिंब व जंगली अशा प्रकारची 15000 झाडे लावण्यात येणार आहेत. खड्डे खोदण्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत 2 हजार खड्डे खोदले आहेत.'' 
यावेळी नगरसेवक अशोक जाधव, शेखर कुसाळे, उद्यान अधिक्षक अरुण खाडे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT