Municipal employees 'watch' on Gadhinglaj vaccination Kolhapur Marathi News
Municipal employees 'watch' on Gadhinglaj vaccination Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला लसीकरणावर पालिका कर्मचाऱ्यांचा "वॉच'

अजित माद्याळे

गडहिंग्लज : कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक लोकांनी घ्यावी यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. शहरातील प्रत्येक मतदान केंद्रनिहाय दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांच्याद्वारे घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. सर्वेक्षणात आढळणाऱ्या लस न घेतलेल्या व्यक्तींना केंद्रावर पाठविण्यात येत आहे. परिणामी लसीकरण मोहिम गतीने होण्यास मदत मिळत आहे. आतापर्यंत शहरात चार हजारावर नागरिकांनी लस घेतली आहे. 

पहिल्या टप्प्यात 45 वर्षावरील इतर व्याधीग्रस्त व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया राबविली. त्यानंतर 45 वर्षावरील सरसकट नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ठरवलेल्या वयोगटातील प्रत्येकांनी लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी प्रशासन गतीमान झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालयासह पालिकेने तयार केलेल्या बॅ नाथ पै विद्यालयातही लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर पालिकेने शहरातील अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी म्हणून नियोजन केले आहे. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी शहरातील प्रत्येक मतदान केंद्रनिहाय दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी प्रत्येक घरात जावून लस घेतलेले व न घेतलेल्यांची माहिती संकलीत करीत आहेत. लस न घेतलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रात कागदपत्र व मोबाईल घेवून जाण्यास सांगितले जात आहे.

उपजिल्हाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे व मुख्याधिकारी श्री. मुतकेकर यांनी समन्वयातून शहरातील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण कसे होईल यादृष्टीने प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागातही लसीकरणाची केंद्रे वाढविल्याने उपजिल्हा रुग्णालयावरील ताण हलका झाला आहे. यामुळे गतीने लसीकरण होण्यास मदत मिळत आहे. नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांची जनजागृती करुन अधिकाधिक नागरिकांना लसीकरण केंद्राकडे पाठवावे, जेणेकरुन शंभर टक्के शहर लसीकरण होण्यास मदत होईल. 

25 नागरिकांचे टार्गेट... 
शहरात 33 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रामागे दोन असे 66 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. घर टू घर सर्व्हे करताना अनेक लोक लस न घेतलेले आढळत आहेत. लसीकरणासाठी हे लोक यावेत म्हणून कर्मचाऱ्यांच्या एका पथकाला रोज 25 नागरिकांना लसीकरण केंद्राकडे पाठविण्याचे टार्गेट दिल्याचेही मुतकेकर यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

Kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT