Muslim community in Kolhapur took responsibility for the funeral of a person affected by the corona 
कोल्हापूर

राजापूर मधील एक वयोवृद्ध आपल्या मुलासह पाठीच्या उपचारासाठी कोल्हापूरला आला अन्....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  कोल्हापूर शहराचे दातृत्व  आणि संकटकाळी झालेली मदत अनेक वेळा अनेक कुटुंबांना व्यक्तींना आयुष्यभर अविस्मरणीय राहते. राजापूर येथून कोल्हापूर येथे उपचारासाठी आलेल्या एका कुटुंबाला याचा पुन्हा एकदा अनुभव आला कोरोना बाधित झालेल्या एका व्यक्तीला कोल्हापुरातील मुस्लिम समाजाने अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली आणि मोठ्या संकटात असलेल्या त्या बाधितच्या मुलाला दिलासा दिला.

राजापूर मधील एक वयोवृद्ध आपल्या मुलासह पाठीच्या उपचारासाठी कोल्हापूर ला दोन दिवसापूर्वी आले होते. त्यापैकी वयोवृद्धाची कोरोना चाचणी पाॅझीटीव्ह आली व मुलाची निगेटीव्ह. दोघांना सीपीआर मध्ये आणण्यात आले. बाप आणि मुलगा विभक्त झाले.अशातच वयोवृद्ध वडीलाचे निधन झाले.  राजापूर आम. हूस्नबानो खलीफे , नगराध्यक्ष जमीर खलीपे यांनी कोल्हापूर येथील त्यांचे मित्र नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांना संपर्क साधून अ्ॅम्ब्यूलन्स व्यवस्था करणेची विनंती केली. कोरोनामुळे कोणीही तयार झाले नाही आणि प्रवासाची परवानगी  मध्ये देखील प्रशासनिक अडचणी होत्या.

तो पन्नास हजार रुपये देणेस तयार झाला पण

सकाळी 11 पासून तौफीकभाई, राजू नदाफ, जाफर मलबारी हे बैतूलमाल कमिटीचे  व सीपीआर मधील  बंटी सावंत ,अमित चौगूले यांनी प्रयत्न सूरू केले. मृतांचे काही नातेवाईक देखील आले. मुस्लिम बोर्डींगशी संपर्क साधून त्यांची परवानगी घेतली. प्रशासनाने पण यासाठी हालचाली सुरू केल्या. इकडे मृताचा मुलगा पन्नास हजार रुपये देणेस तयार झाला तरी कोणी चालक तयार झाले नाही. दुपारी बागल चौक येथेच दफनविधी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

स्थानिक नागरिकांनी केला विरोध मात्र

महानगरपालिका आरोग्य अधिकारी जेसीबी सह येताच स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी दफनविधी करणेस विरोध केला.अमर समर्थ,  स्वप्निल नाईकनवरे यांनी याठिकाणी येऊन समजवण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक नागरिक नसल्याने दफनविधी करू नका अशी भूमिका घेतली गेली.परंतू सांमजस्याने तोडगा काढत दफनविधी करण्याचे ठरले. हे सर्व घडत असताना कोरोनाची भिती स्थानिकांच्या मनातून जावी व आपण देखील तुमच्यासाठीच आहोत, येणारा काळ हा आणखी बिकट येणारा असेल यामुळे स्वतःच दफनविधी करण्याचे बैतूलमाल चे तौफिक मुल्लाणी, जाफर मलबारी,राजू नदाफ यांनी जाफरबाबा परगावी असलेने त्यांना फोनवरून कळवले.

कोल्हापूरकरांचे मानले आभार.

बाबांनी योग्य प्रकारे सर्व करा आणि जनाजा नमाज देखील पठण करा असे सांगितले त्यानुसार कोणतीही भिती न बाळगता पीपीई कीट घालून दफनविधी पार पाडण्यात आले. कोरोनाची लढाई विरोधात आपण सर्वजण एकत्र लढले पाहीजे. नाहीतर तुम लढो ...अशी प्रवृत्ती नसावी याचाच प्रत्यय आज आला. कोल्हापूरकरांच्या धाडसी वृत्तीचा बैतूलमाल कमिटीच्या पदाधिकारी यांनी प्रत्यय दिला. दफनविधीनंतर नातेवाईकांनी व मुलाने फोवरून मनापासून कोल्हापूरकरांचे आभार मानले आणि कोल्हापूरातील लोक "फरीश्ते" आहेत अशा भावना व्यक्त केल्या.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT