Mutton and red-and-white plan in streets
Mutton and red-and-white plan in streets  
कोल्हापूर

गल्ली-गल्लीत होणार मटण अन्‌ तांबडा-पांढऱ्याचा बेत... 

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : टेंबलाईचं पाणी, आंबील-घुगऱ्या, मटणाचा वाटा, तांबडा-पांढरा, बैलगाडीवर अभिमानानं मिरवणारा तालमीचा फलक आणि "पीऽऽऽ ढबाक' हा माहौल यंदा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार नाही. मात्र, मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत गल्ली-गल्लीत यात्रा होणार आहेत. बदलत्या काळात मिरवणुकांचे स्वरूप बदलले मात्र कोल्हापूरकरने त्र्यंबोली यात्रेच्या निमित्ताने "पीऽऽऽ ढबाक'चे महत्व अबाधित ठेवले आहे. यंदा त्याचा ताल आणि सूर फारसा कानावर पडणार नसला तरी यानिमित्ताने या परंपरेला पुन्हा उजाळा मिळणार आहे. 

अनेक प्रकारची पारंपरिक वाद्ये आजही मिरवणुकांत रंगत आणतात. पण, "पीऽऽऽ ढबाक' या नावातही अस्सल रांगडा कोल्हापूरचाच बाज आहे. पी म्हणजे पिपाणी आणि ढबाक्‌ म्हणजे डफड्याचा आवाज. होलार समाजाचं हे प्रमुख वाद्य. पिपाणी म्हणज लहान सनई किंवा सुंदरी. सनई तशी सर्वांना परिचित असली तरी सुंदरी मात्र आता हळूहळू विस्मृतीत निघाली आहे. 

तिच्या जन्माचा इतिहासही फार रंजक आहे. सनईपेक्षा लहान असणारे हे मंजुळ वाद्य. शंभर वर्षापूर्वी अक्कलकोटचे संस्थानिक महाराज फत्तेसिंह भोसले यांनी सोलापूरचे पंडित (कै) बाबूराव जाधव यांना आदेश दिला आणि त्यातून या वाद्याची निर्मिती झाली. (कै) जाधव यांना एका जत्रेत पिपाणीसारखे एक लाकडी खेळणे सापडले. त्याला त्यांनी ताडाची पिपाणी जोडली. ती सुंदर वाजते म्हणून तिचे नाव "सुंदरी'. खैर किंवा सुपारीच्या लाकडापासून ती बनवतात. या दुर्मिळ वाद्याचा देशभर प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी (कै) जाधव यांची पाचवी पिढी प्रयत्न करते आहे. डफड्याचा येणारा "डब डब डब' असा आवाज आणि यावरून अस्सल कोल्हापूरच्या भाषेत "ढबाक' असा शब्द प्रचलित झाला असावा, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. 

"ढबाक' हा डफड्याचा आवाज. हे डफडं खच्चून वाजवलं जाते आणि म्हणूनच नाचाची नशा वाढवते. इतर तालवाद्यांच्या तुलनेत त्याला आस कमी असते आणि म्हणूनच त्याच्या ध्वनीचे तरंग तेवढ्याच पुरते राहतात किंबहुना अधिक काळ ते उमटत नाहीत. 
- शशांक पोवार, संगीतकार 

लक्ष्मीपुरीबरोबरच प्रत्येक गावात होलार समाज आहे. "पीऽऽऽ ढबाक'ला शाहूकालीन परंपरा आहे. हिंदू व मुस्लिम दोन्ही धर्मियांच्या विविध उत्सवात आम्हांला मान आहे. लॉकडाऊनच्या काळात मात्र समाजाचे अर्थकारण कोलमडल्याने शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. 
- अर्जुन माने, अध्यक्ष, होलार समाज 

सुंदरी हे वाद्य जितके मधुर तितकेच दुर्मिळ आहे. मात्र, त्याचे सूर आणि बाज काही औरच आहे. केवळ विशिष्ट घरांपुरतेच हे वाद्य न राहता त्याचे सूर सर्वत्र उमटावेत, यासाठी तिच्या देशभर प्रचार व प्रसारासाठी आमचे आजही प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. 
- कपील जाधव, सुंदरीवादक, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT