new 3 corona positive cases in kolhapur 
कोल्हापूर

मुंबईहून राधानगरीत दाखल झालेल्या एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा..

सुरेश साबळे

कसबा तारळे (कोल्हापूर) :मुळचे गुडाळ (ता. राधानगरी) येथील परंतु सध्या वास्तव्यास मुंबईत असलेल्या व गावाकडे येत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना  कोरोनाची बाधा  झाल्याचे शुक्रवारी रात्री उशिरा  स्पष्ट झाले.


याबाबतची माहिती अशी:

नोकरीनिमित्ताने मुंबईत स्थायिक असलेले  पत्नी आणि 18 वर्षांच्या मुलासह खासगी ट्रॅव्हल्स बसने गावाकडे येत होते. गुरुवारी पहाटे मुदाळ तिठ्ठा येथे ते सर्वजण उतरले.गावी यायच्या तयारीत असताना त्यांचा माजी सरपंच अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी या सर्वांना राधानगरी येथील कोवीड केंद्रात दाखल होवून तेथील वैद्यकीय पथकाचे मार्गदर्शन घेवूनच गावी या असे सांगितले. श्री पाटील यांच्या  सूचनेनुसार हे सर्वजण तेथून एका खासगी गाडीने थेट राधानगरी कोविड केंद्रात तपासणीसाठी गेले.

तेथे तिघांचेही  स्वॅब  घेऊन ते तपासणीसाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले व या सर्वांना केंद्रातच दाखल करून घेतले.  शुक्रवारी रात्री उशिरा या तिघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. असे असले तरी गुडाळ गावाशी त्यांचा संपर्क आलेला नाही. मात्र पिरळ येथील एका खासगी वाहनातून ते सर्वजण मुदाळतिठ्ठा येथून राधानगरीत पोहचल्याचे समजल्याने संबंधित वाहनचालकाचा प्रशासनाने शोध सुरू केला आहे. दरम्यान, त्याचा व त्याच्या थेट संपर्कात आलेल्यांचाही स्वॅब  तपासणीसाठी घेतला जाणार असल्याचे समजते.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT