new 9 corona positive cases in kolhapur 
कोल्हापूर

दुर्दैव ; 'त्या’ चिमुरड्याचे आठ सवंगडी कोरोनाने बाधित....

सकाळ वृत्तसेवा

कुडित्रे (कोल्हापूर) : शिंदेवाडी (ता. करवीर) येथील पोलिस कॉन्स्टेबल बाधित झाल्यानंतर त्यांच्या पुतण्याला बाधा झाली. त्यानंतर तीन दिवसांत या मुलाबरोबर खेळताना तब्बल ३५ मुलांचा संपर्क आला. दरम्यान, ३५ मुलांपैकी आठ मुले आज पॉझिटिव्ह आल्याने गाव धास्तावले आहे. ग्रामपंचायतीने गाव तीन दिवसांसाठी लॉकडाउन केले आहे.


बावडा मुख्यालयात कार्यरत कॉन्स्टेबल केर्लेतील रुग्णाचे पाहुणे आहेत. शुक्रवारी त्या रुग्णाला कोल्हापुरात खासगी रुग्णालयात आणताना ते सोबत होते. त्यानंतर ते क्वारंटाईन झाले. केर्ले येथील रुग्णाच्या प्रथम संपर्कात आल्याने त्यांचा स्वॅब घेतला होता. त्यानंतर अहवालात कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह आला होता.

पोलिसाचा पुतण्या पाचवीत शिकत असून गेले तीन दिवस तो मुलांबरोबर खेळत होता. तीन दिवसांत मुलाच्या संपर्कात आलेल्या ३५ मुलांना सीपीआरमध्ये पाठवले. आणखी चार मुलांचा अहवाल प्राप्त झाला नव्हता. दरम्यान, मुले पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ॲम्बुलन्समधून कोल्हापूरला पाठवण्यात येणार होते. रात्री आठपर्यंत ॲम्बुलन्स आली नाही, यामुळे सर्वांची धाकधूक वाढली.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijeta Dahiya: कोण आहेत विजेता दहिया? बर्गर खाल्ल्यामुळे 'सीजेपी'चं प्रवक्तेपद गमावलं, व्हिडीओ झाला होता व्हायरल

Mulshi Dam Water : मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ८ हजार १०० क्यूसेक्सने विसर्ग सुरू.....

Pune Water Supply : पुण्यात पाणी कपात नाही! महापौर मंजूषा नागपुरेंची घोषणा

CJP च्या 'जंतरमंतर'वरील आंदोलनाने वेधले लक्ष! रोहित शर्मा, सूर्या आणि बुमराहच्या पत्नींची प्रतिक्रिया चर्चेत

Sonam Wangchuk: 'या' अटी मान्य झाल्यास उपोषण सोडेन; रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे सरकारला पत्र, तोडगा निघणार?

SCROLL FOR NEXT