New trends in online fraud; Be careful when accepting friend requests ... 
कोल्हापूर

ऑनलाईन फसवणुकीचा नवा ट्रेंड ;  फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना रहा दक्ष...  

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सोशल मिडीयावर सुंदर मुलीची छायाचित्रे दाखवून समोरच्या तरूणावर भूरळ पाडायची, त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची, चॅटींग करून त्याला जाळ्यात ओढायचे, व्हिडीओ कॉल करून समोरच्या तरुणाला विवस्त्र व्हायला लावायचे. त्याची छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करायचा, असा नवा ऑनलाईन फसवणुकीचा ट्रेंड तरुणांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. याबाबत सावध रहा, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याकडून केले आहे. 
सोशल मिडीयाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, टिव्टर, टिकटॉक सारख्या माध्यमातून नवनवीन मित्र होतात. हाय,हॅलोपासून चर्चा होत हे या मित्रांशी भावनिक नाते निर्माण होते. नेमक्‍या याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी गळ टाकून बसले आहेत. अशा गुन्हेगारांकडून तरूणांच्या सोशल अकाउंटवर अनोळख्या मुलीचींच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. त्या प्रोफाईलवर सुंदर मुलीचा फोटो असतो. पण या व्यक्तीला कधीही पाहीले नसतानाही तिची फ्रेंड रिक्वेस्ट तरूणाकडून स्वीकारली जाते. 

पैशाची मागणी 
नव्याने झालेल्या मैत्रिणीकडून संदेश सुरू होतात. त्यानंतर तरूणाचे नाव, पत्ता, मित्र मंडळी अशी माहिती रात्री उशीरापर्यंत गप्पा मारून काढून घेतली जाते. यातच तरुणाला व्हिडीओ कॉल येतो. त्याला विवस्त्र व्हायला सांगितले जाते. मैत्रीचे प्रकरण पुढे पर्यंत गेले असे समजून काही तरूण यात अडकतात. त्यानंतर त्या तरूणाला मुलीच्या अकौंटमागे दडलेला गुन्हेगार पैशाची मागणी करतो. ते नाही दिले तर विवस्त्र झालेला व्हिडीओ व फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देतो. तसे अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेले तरूण मागणी प्रमाणे पैसे देतात. स्वतःचे बरेवाईट करून घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहचतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

‘फुलों का तारों का…’ गाणं आठवतं? रक्षाबंधनाच्या दिवशी हमखास ऐकलं जातं, पण हे गाणं कोणी लिहिलं?

SCROLL FOR NEXT