In Nine Gram Panchayats In Hatkanangale Taluka, The Ruling Party Has Been Elected Kolhapur Marathi News
In Nine Gram Panchayats In Hatkanangale Taluka, The Ruling Party Has Been Elected Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

हातकणंगले तालुक्‍यात नऊ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांना कौल 

अतुल मंडपे

हातकणंगले : तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. दहा ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. 9 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता कायम राहिली आहे. एकमेव खोची ग्रामपंचायतीत संमिश्र सत्ता आली. तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडीनंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. 20 ग्रामपंचायतींसाठी नोटासाठी झालेले 2 हजार 941 मतदान उमेदवार व नेत्यांना चिंतन करायला लावणारे ठरले आहे. 

निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक गटातच टोकाची ईर्ष्या रंगली होती. आज सकाळी आठ वाजता प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, अपर तहसीलदार शरद पाटील, नायब तहसीलदार दिगंबर सानप आदींच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरवात झाली. सकाळपासूनच झुंडीने कार्यकर्ते तहसील कार्यालयाच्या आवारात जमा होत होते. निकाल लागेल तसा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. 

मातब्बर पराभूत 
582 उमेदवारांपैकी अनेक मातब्बर या निवडणुकीत पराभूत झाले. यामध्ये प्रामुख्याने खासदार धैर्यशील माने यांचे कट्टर सर्मथक झाकीर भालदार, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण मगदूम, माजी उपसरपंच राजू जगदाळे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

दोन-तीन मतांनी पराभव 
रुई येथे ईर्ष्येने मतदान झाले. प्रभाग दोनमधून दीपाली सकटे यांना 541 तर वर्षा घायतिडक यांना 539 मते मिळाली. प्रभाग सहामधून अश्विनी पोवार यांना 474 तर सपना शिंदे यांना 471 मते मिळाली. केवळ दोन व तीन मतांनी पराभव झाल्याने पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मागणी फेटाळली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT