इचलकरंजी - तांबडा, पांढरा रस्ता आणि चमचमीत मटण यावर ताव मारणार्या मंडळींची लॉक डाऊनमुळे मोठी गोची निर्माण झाली होती. पण आता शहरात अनेकांनी पार्सल सुविधा सुरु केल्यांने अशा खवय्यांची अडचण दूर झाली आहे. लॉक डाऊनच्या कालावधीतही अशा प्रकारच्या पार्सल सेवेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अनेकांनी मार्गही शोधला आहे. विशेष म्हणजे जास्त ऑर्डरी मिळविण्यासाठी आकर्षक पॅकेजचीही भुरळ घालण्यात आली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन जाहीर केला. या कालावधीत शहरातील रेस्टॉरंट, घरगुती मांसाहरी खानावळी बंद ठेवण्यात आल्या आहेत. लॉक डाऊन शिथील झाल्यानंतरही त्यावर बंदी कायम आहे. त्यामुळे तांबडा - पांढरा रस्सा यावर ताव मारणार्या खवैय्यांची मात्र मोठी अडचण झाली.
मुळात इचलकरंजीतील घरगुती मासांहरी खानावळी दूरपर्यंत प्रसिध्द आहेत. अनेकांना अशा घरगुती खानावळीत जावून भारतीय बैठक मारुन भाकरीसह मटण खाण्याची मोठी हौस आहे. आठवड्यातून या ठिकाणी जाण्यांचे अनेकांचे दिवस ठरलेले आहेत. पण लॉक डाऊनमुळे या खवय्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. पण आता त्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी पार्सल सुविधा सुरु झाली आहे.
मुळात लॉक डाऊनमुळे सर्वच घटकांची आर्थिक कोंडी झाली. पण त्यातूनही उत्पन्नाची संधी शोधणारे अनेकजण आहेत. अनेकांनी वेगवेगळे उत्पन्नाचे मार्ग शोधले. यापैकी लॉक डाऊनच्या कालावधीत अनेकांनी घरपोच मासांहारी पदार्थांची पार्सल सुविधा सुुरु केली. त्यामुळे रेस्टारंट, खानावळी जरी बंद असल्या तरी मटण, चिकन, अंडाकरी पदार्थांचे आता सहज पार्सल उपलब्ध होत आहेत. फोनवर ऑर्डर केल्यास अगदी थेट घरपोच पार्सल मिळत आहे. खवय्यांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या घरपोच पार्सल सेवेची सोशल मिडियावरही शहरात मोठी धूम आहे.
सवलतीच्या पॅकेजची भूरळ
यामध्ये सोशल मिडियाचा खुबीने वापर करुन पार्सल सुविधेची जाहीरात केली आहे. ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी विशेष पॅकेजचीही भुरळ घालण्यात आली आहे. जास्त ताटांची आर्डर दिल्यास वेगवेगळ्या सवलतीचेही दर देण्यात आले आहेत. ‘मटण तुमचे, जेवण आमचे‘ ही संकल्पनाही राबवली आहे. त्यामुळे आता पून्हा एकदा मटण, चिकनसह तांबडा - पांढरा रस्सा यावर खवय्ये ताव मारीत आहेत.
“लॉक डाऊनच्या कालावधीत विविध प्रकारच्या मांसाहरी पदार्थाच्या पार्सल सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘मटण तुमचे, जेवण आमचे‘ ही संकल्पनाही अनेकांना आवडली आहे.“ - पंढरीनाथ ठाणेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.