Now Control Of Gadhinglaj Factory To The Director Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज कारखान्याचा ताबा संचालकांकडे

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीने आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याला (गोडसाखर) दिलेल्या सोडचिठ्ठीवर आज शिक्कामोर्तब झाले. साखर आयुक्तालयाच्या चार सदस्यीय समितीचे प्रमुख, पुणे आयुक्तालयाचे संचालक (प्रशासन) डॉ. संजयकुमार भोसले यांच्या मध्यस्थीने गोडसाखर कारखान्याचा ताबा अध्यक्ष ऍड. श्रीपतराव शिंदे, उपाध्यक्ष डॉ. संग्रामसिंह नलवडे यांच्यासह संचालक मंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. 

ब्रिस्क कंपनीतर्फे जनरल मॅनेजर व्ही. एच. गुजर, फायनान्स मॅनेजर ए. ए. लोहार यांनी संचालक डॉ. भोसले यांच्याकडे, तर डॉ. भोसले यांनी कारखाना व्यवस्थापनाकडे गोडसाखरच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली. दुपारी सव्वाबारा वाजता ताबापट्टी देण्यासाठी आयुक्तालयाचे समिती प्रमुख डॉ. भोसले यांच्यासह प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. एस. एन. जाधव, प्रथम विशेष लेखापरीक्षक पी. ए. मोहोळकर, तृतीय विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे यांची समिती कारखाना कार्यस्थळावर आली.

कारखान्याच्या सभागृहात अध्यक्ष ऍड. शिंदे, उपाध्यक्ष डॉ. नलवडे, संचालक प्रकाश चव्हाण, बाळासाहेब मोरे, अनंत कुलकर्णी, सतीश पाटील, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, सुभाष शिंदे, दीपक जाधव, प्रकाश पताडे, सदानंद हत्तरकी, क्रांतिदेवी कुराडे, जयश्री पाटील, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक यांच्या समवेत समितीची बैठक झाली. संचालक डॉ. प्रकाश शहापूरकर व किरण पाटील अनुपस्थित होते. 

या बैठकीत डॉ. भोसले यांनी सहकार विभागाचे अप्पर सचिव अरविंदकुमार यांच्या आदेशाचे वाचन केले. ऍड. शिंदे, डॉ. नलवडे, चव्हाण यांनी विद्यमान कामगारांचे थकीत पगार व इतर देणी, यावर्षीच्या हंगामातील ऊस, तोडणी- ओढणीची बिले कंपनीने एक महिन्याच्या आत द्यावीत, तारखेसह तसे लेखी पत्र कंपनीकडून आयुक्तालयाने घ्यावे, अशी सूचना केली.

मुदतीत देणी न दिल्यास कंपनीला पेनल्टी द्यावी लागेल, असेही सूचित केले. चव्हाण यांनी कंपनीचे जबाबदार पदाधिकारी कुठे आहेत, श्री. गुजर यांना लेखी हमी देण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्‍न केला. कारखाना ताब्यात देण्याच्या आदेशासह प्रत्यक्ष ताबापट्टीपर्यंतचा कालावधी पाहता या प्रक्रियेत अत्यंत घाईगडबड केली असून कुठेतरी दडपशाहीचा वास येत असल्याचा आरोप डॉ. नलवडे यांनी केला. यावेळी प्रकाश चव्हाण, डॉ. नलवडे आणि सतीश पाटील, प्रकाश पताडे यांच्यात चर्चेदरम्यान शाब्दिक चकमक उडाली. 

पंचनामा करा... 
कारखाना आवारात सोडलेल्या स्पेंट वॉशमुळे कारखान्याची नर्सरी, नारळाच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीला ताब्यात देताना कारखाना कसा होता, त्याच पद्धतीने कारखान्याकडे ताबा देतानाही तो तसाच असावा, झाडांसह मशिनरी, इतर वस्तूंचा पंचनामा करून त्याची भरपाई कंपनीने द्यावी, अशी मागणीही ऍड. शिंदे, डॉ. नलवडे यांनी केली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

SCROLL FOR NEXT