number of corona positive patients in Belgaum district reached a record high this week 
कोल्हापूर

बेळगाव जिल्ह्यात 8 दिवसांत 1,223 कोरोना पॉझिटिव्ह ; बळींची संख्या 22 वर...

महेश काशीद

बेळगाव - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्याने या आठवड्यात उच्चांक गाठले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 155 इतकी आहे. त्यापैकी तब्बल 1 हजार 223 कोरोनाबाधितांची भर आठवड्यात झाली. तसेच या कालावधीत 22 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. विशेष म्हणजे 19 ते 25 दरम्यान डिस्चार्ज नोंद नव्हती. रविवारी 204 जणांना घरी सोडण्यात आले आहे 

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2,155 आहे. त्यात 50 टक्‍क्‍याहून अधिक जणांना या आठवड्यात संसर्ग झाल्याचे आकडेवारी सांगते. 19 ते 27 जुलै दरम्यान 1,223 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, पैकी सर्वाधिक 341 जणांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. आतापर्यंतची ही उच्चांक संख्या ठरली आहे. कोरोनामुळे 46 जणांचा मृत्यू झाला आहे. पैकी 22 जणांचा मृत्यू आठवड्यात झाला आहे. सर्वाधिक सहा जणांचा मृत्यू रविवारी झाला आहे. त्यापाठोपाठ पाच जणांचा शनिवारी, गुरुवारी चौघांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे संख्या वाढत असताना रविवारी दिलासा मिळाला. कोरोनावर मात करण्यात आलेल्या 208 जणांना रविवारी घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 1 हजार 442 जणांवर उपचार सुरु आहे. त्यामुळे चालू आठवड्यात खूप मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. मार्च ते जून कालावधीत कोरोनाबाधितांची संख्या केवळ सहाशे ते सातशे होती. जुलै महिन्यांत कोरोनाचा कहर सुरु झाला. 26 दिवसांमध्ये बाधितांच्या आकड्याने दोन हजाराचा आकडा ओलांडला. यामध्ये या आठवड्यात उद्रेक झाल्याचे बाधितांच्या आकड्यावरून स्पष्ट झाले आहे. 

           तारीख-बाधित-मृत्यू-डिस्चार्ज-एकूण 

  • 26(रविवार)-163-6-208-2,155 
  • 25(शनिवार)-341-5-00-1,992 
  • 24(शुक्रवार)-116-1-00-1,651 
  • 23(गुरुवार)-214-4-00-1,535 
  • 22(बुधवार)-219-0-00-1,315 
  • 21(मंगळवार)-23-4-00-1,102 
  • 20(सोमवार)-60-0-00-1,079 
  • 19(रविवार)-87-2-00-1,019 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असली तरी त्यात बेळगाव तालुक्‍यामध्ये सर्वाधिक संसर्गची नोंद आहे. वर्दळ अधिक आणि सोशल डिस्टस्टिंग पाळणे खूप अवघड जाते. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. 
संजय डूमगोळ - तालुका आरोग्य अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT