कोल्हापूर : शौर्याची परंपरा सांगणाऱ्या ऐतिहासिक शस्त्रांचा शहरातील शिवकालीन मर्दानी आखाड्यांत आज खजिना पाहायला मिळाला. भावी पिढ्यांना त्यांचे महत्त्व कळावे, यासाठी या शस्त्रांची प्रशिक्षकांकडून माहिती दिली आणि त्यांचे उत्साहात पूजनही केले. खंडे नवमीला शस्त्र पूजनाची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्र आजही अनेक घरांत आढळून येतात. या शस्त्रांचे प्रशिक्षण देणारे आखाडे शहरात आहेत.
शिवाजी पेठेतील खंडोबा वेताळ तालमीच्या मर्दानीराजा सुहासराजे ठोंबरे आखाड्यातर्फे शिवकालीन शस्त्रांचे वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या हस्ते पूजन झाले. ढाल, तलवार, पट्टा, विटा, गुर्ज, कटयार, फरी गदका, लाठी-बोथाटी शस्त्रे मांडली होती. शाहीर मिलिंद सावंत यांनी शस्त्रे व शस्त्रांची माहिती वदिली. यावेळी किरण जाधव, बाळासाहेब शिकलगार, शिवतेज ठोंबरे, शिवबा व शाहूराज सावंत, अथर्व जाधव, महेश सावंत, केदार व शिवानी ठोंबरे उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे कसबा बावड्यातील शिवकालीन केंद्रात शस्त्रपूजन झाले. प्रशिक्षक प्रदीप थोरवत यांनी शस्त्रांविषयी माहिती दिली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत साळोखे, सचिव प्रवीण हुबाळे, चेतन बिरंजे, किरण चाबुकस्वार, सई थोरवत, रोहन भोगले, राजेंद्र कटकर, सुजित जाधव, मेघा माळी, समर्थ खांडेकर, डॉ. मंगेश पाटील उपस्थित होते.
आनंदराव पोवार शिवकालीन प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेत विविध प्रकारचे भाले, मराठा, तेगा, नागीन, सिरोही, दुधारी, समशेर, खांडा, पट्टा, जांबिया, कट्यार, ढाल यासह शेकडो शस्त्र आहेत. यंदा राजस्थान इथल्या राजपूत घराण्यातील मोहब्बत सिंग देओल यांच्या हस्ते त्यांचे पूजन झाले. यावेळी वस्ताद पंडित पोवार, माजी नगरसेवक ईश्वर परमार, बंडा भोसले, डॅनी पोवार, रवी दुर्गे, निखिल पोवार उपस्थित होते. संयुक्त जुना बुधवार पेठ मर्दानी आखाड्यातर्फे प्रशिक्षक योगेश पाटील यांनी शस्त्रपूजन केले. यावेळी राकेश मिस्त्री, विश्वतेज पाटील, अभिषेक पाटील, आदित्य खाडे उपस्थित होते.
४५० शस्त्रे
मर्दानी खेळ कोल्हापूरतर्फे ४५० शस्त्रे आज मांडली. काल दुपारी बारा ते पहाटे तीनपर्यंत त्यांची साफसफाई केली. पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते सकाळी त्यांचे पूजन झाले. शस्त्र अभ्यासक विनोद साळोखे यांच्या संग्रहातील ही शस्त्रे इराण, अफगाण, मुघल व मराठाकालीन आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.