one arrested who swindled Rs 14 lakh for the lure of gift cards kolhapur
one arrested who swindled Rs 14 lakh for the lure of gift cards kolhapur 
कोल्हापूर

गिफ्ट कार्ड देण्याच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक करणारा गजाआड 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - निम्या किमतीने खरेदी करता येईल असे गीफ्ट कार्ड देतो असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एकास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. अविष्कार सुनील पाटील (वय 29, रा. वरळी मुंबई) असे त्या संशयिताचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मुंबईतील संशयित अविष्कार पाटील व त्याचे वडील सुनील पाटील या दोघांनी कोल्हापुरातील लोकांचा विश्‍वास संपादन केला. त्यांना एका मॉलचे गिफ्ट कार्ड आधारे निम्या किमंतीत इलेक्‍ट्रॉनिक वस्तू देण्याचे अमिष दाखवले. त्या दोघांनी सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर 2020 या कालावधित 14 लाख एक हजारांचा गंडा घातल्या प्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संशयित अविष्कारला अटक केली. त्याला सोमवार (ता.11) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

तपासात संशयिताने नोकरी लावण्याच्या अमिषाने फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. याबाबत तक्रार असल्यास त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी केले.
 
संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT