one corona positive case in kolhapur gargoti
one corona positive case in kolhapur gargoti 
कोल्हापूर

कोल्हापुरातील गारगोटीत समुह संसर्गाचा धोका वाढला      

धनाजी आरडे

गारगोटी : येथील श्री कॉलनीतील ५० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. या आठवड्यात सामूहिक संसर्गातून दोन स्थानिक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे  खबरदारीची उपाययोजना म्हणून गारगोटी ग्रामपंचायतीने उद्या शनिवारपासून दोन दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच संदेश भोपळे यांनी दिली.

कूर येथील एक वृद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिचा कोल्हापुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कूरला लॉकडाऊन सुरू करण्यात आले. तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना अलगीकरण कक्षात पाठविण्यात आले. यापाठोपाठ गारगोटीतील श्री कॉलनीतील ५० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे. या व्यक्तीवर एका खासगी डॉक्टरकडे उपचार सुरू होते. जास्त त्रास होऊ लागल्याने बुधवारी कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे  त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. गुरूवारी रात्री त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कातील पत्नी कोल्हापूर येथे आहे. तर दोन मुले, एक शिक्षक, पाचवडे येथील नातेवाईक, खासगी डॉक्टर अशा  पंधरा जणांना अलगीकरण कक्षात दाखल केले आहे. यातील सात जण हाय रिस्कवर आहेत. तहसीलदार अमोल कदम यांनी शुक्रवारी सकाळी रुग्ण आढळलेल्या परिसरासाठी प्रतिबंधित क्षेत्र आदेश लागू केला.


तालुका आरोग्य अधिकारी एस. बी. एत्नाळकर, सरपंच संदेश भोपळे, सदस्य प्रकाश वास्कर, स्नेहल कोटकर यांच्यासह सदस्यांनी श्री कॉलनी परिसर सील केला. तर सामूहिक संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायत व व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बैठक घेऊन हा दोन दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच संदेश भोपळे यांनी सांगितले.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT