Online teaching for hsc in lockdown  
कोल्हापूर

'बारावी'साठी ऑनलाईन अध्यापन ! 'लॉक डाऊन'चा केला असाही उपयोग..

अशोक परीट

निपाणी - अर्जुननगर (ता. कागल) येथील जनता शिक्षण मंडळ संचलित देवचंद महाविद्यालयामार्फत बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अध्यापन सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन काळात विद्यार्थी घरीच आहेत. त्याचा उपयोग करून घेण्यासाठी ॲपद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे सर्वांनाच लॉक डाउन होऊन घरी बसावे लागले. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन या लॉक डाउनचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी करता यावा, या हेतूने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर यांनी संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली 'झूम ॲप'द्वारे प्राध्यापकांची बैठक घेतली. त्यामध्ये एक समिती स्थापन करून सर्व वर्गांचे वेळापत्रक तयार केले. बारावीचा अभ्यासक्रम बदललेला असून त्याची पुस्तके 'पीडीएफ'द्वारे विद्यार्थ्यापर्यंत प्राध्यापकांनी पोहोचवली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षासह अभ्यासक्रमाचे गांभीर्य लक्षात घेऊन झूम अॅप डाऊनलोड केले आहे. वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाइन अध्यापन चालू असताना ते दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन हजर रहात आहेत.

प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एच. व्ही. पंडित, पर्यवेक्षिका प्रा. के. डी. पाटील-बिरनाळे व पर्यवेक्षक प्रा. एस. जी. कागवाडे यांच्या मार्गदर्शनातून प्रा. विनायक कुंभार आणि स्वप्निल पोतदार यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या आहेत. प्रा. एन. एस. कोले व प्रा. एस. जी. कागवाडे यांच्यासह त्यांच्या समितीमार्फत अध्यापनासाठी प्रा. एन. पी. जामदार आणि प्रा. सागर परीट यांनी वेळापत्रक तयार केले आहे.

विद्यार्थी अभ्यासाबरोबर प्राध्यापकांच्या संपर्कात

कला व वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील वर्ग शिक्षकांनी व्हाट्सॲपद्वारे विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार केले आहेत. त्या ग्रुपला चाळीस मिनिटे अध्यापन सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही अभ्यासाची सवय लागत असून ते महाविद्यालय आणि प्राध्यापकांच्या संपर्कात राहून शिकत आहेत.
 

'सध्या लॉक डाऊन सुरू आहे. या रिकाम्या वेळेचा बारावी विद्यार्थ्यांना उपयोग होण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. त्यातून गुणवत्तावाढीसाठी निश्चितच मदत होईल.'
- डॉ. पी. एम. हेरेकर,
 प्राचार्य, देवचंद महाविद्यालय-अर्जुननगर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: विरार ते मरीन ड्राइव्ह आता नॉन-स्टॉप! सी लिंक प्रकल्पाला 'पर्यावरण'ची अंतिम मंजुरी

Female Doctor Case: पीएसआय आणि अन्य आरोपीनं महिला डॉक्टरचा छळ का केला? पीडितेच्या भावानं खरं कारणच सांगितलं, वाचा इनसाईड स्टोरी...

23 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचं गंभीर आजारामुळे निधन; सिनेविश्वावर शोककळा

Mumbai News: रोजंदारी कामगारांची दिवाळी अंधारात! आरोग्य विभागाकडून बोनसचा प्रस्ताव रखडला

Weekly Horoscope 27 October to 2 November: हंस राजयोग कर्क राशीसह 5 राशींचे भाग्य उजळेल, अपूर्ण इच्छा होईल पूर्ण

SCROLL FOR NEXT